wife swapping in india news, धक्कादायक! पतीकडून थेट ‘बायको अदला-बदलीची ऑफर’, रोज वेगळ्या मित्रासोबत संबंध ठेवायचे अन्… – love crime news husband force wife for wife swapping game police registered a case
बीकानेर : लव्ह, सेक्स आणि धोका (Love, Sex And Dhoka)यातून अनेक गंभीर गुन्हे होत असल्याचं समोर येत आहे. असाच एक भयंकर प्रकार घडला आहे. एका महिलेसोबत तिच्या पतीने वाईफ स्वॅपिंग गेम (पत्नीची अदला-बदली)खेळण्यासाठी दबाव टाकला. पत्नीने यासाठी नकार दिल्यानंतर असं काही घडलं की घटना वाचून तुम्हीही हादराल.
राजस्थानच्या बीकानेरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. इथे पतीने स्वत:च्या पत्नीला वाईफ स्वॅपिंग गेम खेळण्यासाठी सांगितलं. म्हणजे यामध्ये आपल्या पत्नीसोबत इतर लोकही संबंध ठेवू शकतील. महिलेने असं करण्यासाठी नकार देताच पतीने पीडितेला बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे. Love Affair : प्रेमात अडचण ठरणाऱ्या डॉक्टर पतीचा काढला काटा, भुलीचं इंजेक्शन दिल्याने कोमात, ३२ दिवसांनी घडलं भयंकर
महिलेने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, पती हॉटेलचा मॅनजर आहे. त्याने तिथे पत्नीला बेदम मारहाण केली आणि तिचा मोबाईल हिसाकवून घेतला. इतकंच नाहीतर तिला हॉटेलमध्ये बंद करून निघून गेला. महिलेने पतीवर गंभीर आरोप केले असून पतीचे इतर महिलांशी संबंध असल्याचंही तिने पोलिसांना सांगितलं.
महिलेला केली बेदम मारहाण…
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आरोप केली आहे की, पतीचे वागणे अतिशय वाईट आहे. तो त्याच्या मित्रांसोबत वाईफ स्वॅपिंग गेम खेळतो आणि त्यासाठी त्याने पत्नीवरही दबाव टाकला. नकार देताच त्याने बेदम मारहाण केली आणि पत्नीसोबत अप्राकृतिक संबंध बनवले. महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडा मागत असल्याचाही आरोप केला आहे.