भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या १७ ग्रामपंचायती करिता झालेल्या निवडणुकीचा निकल जाहीर होऊन यातील ११ ग्रामपंचायतीवर शिंदे समर्थित आमदार भोंडेकर गटाचे सरपंच विजय झाले आहेत. विजय उमेदवारांनी आमदार भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांसह पोहोचले. जिथे नरेंद्र भोंडेकर यांनी सर्व सरपंचांना शुभेच्छा देत त्यांचे स्वागत केले.

विशेष म्हणजे भोजापुर आणि टेकेपार या दोन ग्रामपंचायतीवर सरपंच आणि संपूर्ण पॅनलचा विजय झाला आहे. विजय झालेल्या सरपंच उमेदवारांमध्ये राजेदहेगाव – स्वाती रत्नदीप हुमणे, खराडी – आशा संजय हिवसे, पिपरी – देवदास ठवकर, संगम – शारदा मेश्राम, केसलवाडा – आशु वंजारी, खैरी – सलीता जयदेव गंथाडे, टेकेपार – प्रियंका दिनेश कुंभलकर, गोसीखुर्द – आशिष माटे, भोजापुर – सीमा जयेंद्र मेश्राम, खमाटा – रुपाली रणजित भेदे, इटगाव – कविता सोमनाथ चौधरी यांचा विजय झाला आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप आऊट, मुरजी पटेल अपक्ष लढणार का? बावनकुळेंनी थेट उत्तर दिलं…
सोबतच संपूर्ण १७ ग्रामपंचायत येथून १३७ सदस्य उमेदवार लढविण्यात आले होते. ज्यातून ८० सदस्य विजय झाले आहेत. वरील संपूर्ण विजय उमेदवारांनी आपल्या विजयाचे श्रेय नरेंद्र भोंडेकर, जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, तालुका प्रमुख राजेश सार्वे, शहर प्रमुख मनोज साकोरे यांना दिला आहे.

Andheri bypoll: मुरजी पटेलांच्या कार्यकर्त्यांना आशिष शेलार म्हणाले, ‘ऊर्जा राखून ठेवा, दोन महिन्यांनी…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here