Authored by सचिन जाधव | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Oct 2022, 4:05 pm

Satara News : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीवर शंभुराजेंच्या गटाची सत्ता आली आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची ६० वर्ष सत्ता असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायत त्यांच्या हातातून निसटलेली असून उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने या ठिकाणी सत्ता मिळवलीये.

 

Gram Panchayat Shambhuraj Desai Election
पाटणकरांना झटका, शंभूराजांनी ६० वर्षानंतर ग्रामपंचायत हिसकावली
सातारा : राज्यातील १ हजार ७९ ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आज होणार आहे. १८ जिल्ह्यातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींपैकी ८७ जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे १ हजार ७९ जागांसाठी काल मतदान पार पडलं. याच निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. या ग्रामपंचायतींमधील मतमोजणी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. त्यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीत उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गटाची सत्ता आली आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची ६० वर्ष सत्ता असलेल्या मोरगिरी ग्रामपंचायत त्यांच्या हातातून निसटलेली असून शंभूराज देसाई यांच्या गटाने या ठिकाणी सत्ता मिळवलीये. सरपंच पदासह आठही जागा शंभुराज देसाईंच्या गटानं जिंकल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या होत्या. यामध्ये पाटण तालुक्यातील दोन, महाबळेश्वर तालुक्यातील एक, जावळी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा समावेश होता. यामध्ये पाटण तालुक्यातील मोरगिरी ही ग्रामपंचायत निवडणुक प्रतिष्ठेची झाली होती. यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाटण तालुक्यात पहिली ग्रामपंचायत जिंकता येणार का यावर याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राष्ट्रवादीसह पाटणकर गटाला मोठा धक्का देत शंभुराजेंनी मोरगिरी ग्रामपंचायतीवर स्वत:चा झेंडा फडकवला आहे.
Andheri ByPoll: निवडणुकीतून माघार घेण्यासाठी कुणाचा दबाव, मुरजी पटेलांनी स्पष्टच सांगितलं…
राज्य निवडणूक आयोगाने १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल प्रत्यक्षात १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळत मतदान झाले. दुपारी ३.३० पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी ६४.८३ टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी आज मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. मात्र, विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांसह स्थानिक नेते या निवडणुकीसाठी आपले राजकीय कसब पणाला लावतात. कारण या निवडणुकांमध्ये मिळालेली ताकद पुढे तालुका पातळीवरील निवडणुकीसाठी उपयुक्त ठरते. त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकींना आक्रमकपणे सामोरे गेले होते.

Virat Kohli: विराट कोहलीची ‘दिवानी’, या फोटोतील ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here