eknath khadse wife manda khadse, एकनाथ खडसेंच्या पत्नीचा मोठ्या घोटाळ्यात हात? गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या – eknath khadse wife manda khadse president of the district milk union in trouble
जळगाव : एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते. त्या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या पत्नी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षा मंदा खडसे (Mandakini Khadse) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा दूध संघातील दूध पावडर तसेच लोणी या घोटाळा (District Milk federation) प्रकरणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दीड कोटी रुपयांच्या अपराचीराची तक्रार पोलिसात दिली होती. एकनाथ खडसे संचालक मंडळाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली होती. या दोन्ही तक्रारींची दखल घेत पोलिसांनी स्वतःच या प्रकरणी अपहाराचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. Grampanchayat Result : फक्त शिंदे गटाचाच बोलबाला; १७ पैकी ११ ग्रामपंचायतीवर विजय, ठाकरे गटाला मोठा धक्का या घोटाळयात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळ अन्य याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा दूध संघाच्या चेअरमन म्हणजेच अध्यक्ष्या एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आहेत. आता जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. या घटनेत पोलीस काय तपास करतात?, जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमकं कोण दोषी म्हणून समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.