नवी दिल्ली : धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. वैयक्तिक वापराव्यतिरिक्त सोने हा सर्वसामान्यांमध्ये गुंतवणुकीसाठी देखील चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी आणि विक्री वाढते. या काळात काही विक्रेते दागिन्यांवर मेकिंग चार्जेस, जीएसटी आणि इतर दर चुकीच्या पद्धतीने लावतात. म्हणूनच जर तुम्हालाही धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करायचे असेल, तर आधी काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल खोलवर माहिती जाणून घ्या.

सोन्याचे दागिने खरेदी करताना फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांनी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

हॉलमार्किंग नसलेल्या तुमच्याकडील जुन्या दागिन्यांचं काय होणार, विकता येणार का

प्रमाणित सोने खरेदी करा
ग्राहकाने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्कसह प्रमाणित सोने खरेदी केले पाहिजे. हे सोन्याची शुद्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करते. हॉलमार्क व्यतिरिक्त ग्राहकांनी शुद्धता कोड, चाचणी केंद्र चिन्ह, ज्वेलर्सचे चिन्ह आणि उत्पादनाचे वर्ष देखील तपासावे.

सध्याचे सोन्याचे दर तपासा
जेव्हा पण तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी बाहेर जाल त्यापूर्वी तुम्ही नेहमी सोन्याच्या किमती जाणून घ्या कारण ते वेळोवेळी बदलत असतात. तुम्ही २४ कॅरेट किंवा २२ कॅरेट किंवा १८ कॅरेट शुद्धतेचे सोने खरेदी करत आहात यावरही सोन्याची किंमत अवलंबून असते. कारण त्या सर्वांच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

सोन्यातील गुंतवणूक कुठे कराल? सणवारात बक्कळ पैसा कमावण्यासाठी कोणता फायद्याचा पर्याय
रोख पैसे देऊ नका, पावती घ्या
सोने खरेदी करण्यासाठी रोख पेमेंट टाळले पाहिजे आणि शक्यतो UPI किंवा इतर पेमेंट अॅप सारख्या ऑनलाइन बँकिंग प्रणालीद्वारे पेमेंट केले जावे. तसेच सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडून पावती घ्यायला विसरू नका. त्याच वेळी, जर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करून सोन्याच्या वस्तू खरेदी करत असाल, तर डिलिव्हरीच्या वेळी पॅकेजसोबत छेडछाड झालेली नाही याची खात्री करा.

विश्वसनीय दुकानातून खरेदी करा
सोन्याचे दागिने किंवा इतर वस्तू नेहमी विश्वसनीय दुकानातून खरेदी करणे फायद्याचे असते. पण यासाठी तुम्ही विक्रेत्याची सत्यता देखील सुनिश्चित केली पाहिजे.

दसऱ्याला ग्राहकांनी खरोखर सोनं लुटलं, आता दिवाळीला होणार बंपर धमाका
पुनर्विक्री आणि बायबॅक धोरणं जाणून घ्या
सोने खरेदी करताना ग्राहकाला त्याची पुनर्विक्रीची किंमत आणि विक्रेत्याचे बाय-बॅक धोरण माहित असले पाहिजे. कारण काही विक्रेते तुमच्या दागिन्यांची पुनर्खरेदी करताना सोन्याच्या मूल्यातून काही टक्के वजा करतात तर काही विक्रेते सध्याच्या दरानेच खरेदी करू शकतात.

दुसरीकडे, जर तुम्ही गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे दिलेल्या सार्वभौम सुवर्ण रोखे (SGB) मध्ये देखील गुंतवणूक करू शकता. हा एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय असून गुंतवणूकदाराला यामधून चांगला परतावा देखील मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here