चंद्रपूर : राजुरा विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या निकालाने काँग्रेस पक्षात जल्लोषाचे वातावरण आहे. ८४ ग्रामपंचायते पैकी ३६ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विराजमान झाले आहे. काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांनी गड राखला आहे तर जिल्ह्यातील २७ ग्रामपंचयतीवर कमळ फुलले आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीने मोठी उसंडी मारीत ९ जागा जिंकल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ९४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील सहा ग्रामपंचायती आधीच अविरोध निवडल्या गेल्या आहेत. आज ८८ ग्रामपंचायतींचे निकाल लागले. यात मुल ३,चिमूर ४, भद्रावती २, ब्रह्मपुरी १, कोरपना २५, जिवती २९ तर राजुरा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. लागलेला निकाल काँग्रेससाठी सुखावणारा ठरला. राजुरा विधानसभा क्षेत्रातील ८४ पैकी ३६ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळविला. जिल्हात एकूण ९४ पैकी काँग्रेसने ३९ जागा ग्रामपंचायत जिकल्या आहेत. भाजपने जिल्हात २७ विजय मिळविला आहे. Grampanchayat Result : डंका कोणाचा! ११ पैकी १० जागा जिंकल्या पण अवघ्या १ मताने विजय झाल्याने गेम पालटला असा आहे निकाल…
जिवती तालुका निकाल काँग्रेस १२ भाजपा ७ गोंडवाना ३ वंचित ३ अपक्ष २ संघटना १ राष्ट्रवादी १
कोरपना तालुका निकाल… काँग्रेस १३ भाजप ६ संघटना ३ गोंडवाना १ इतर मिक्स युती २