औरंगाबाद : शिंदे गटाचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे नेहमी सभा गाजवण्यात तरबेज आहेत. आज सिल्लोड येथे पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित सभा होती. या सभेला कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रेल्वे मंत्री केंद्र रावसाहेब या तीन मंत्र्यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. या सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी तुफान भाषण करत चौफेर फटकेबाजी केली.

“पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया उस जैसा”, असे सत्तार आहेत कुठेही मिसळून जातात. सत्तार बऱ्याच पक्षात गेले आणि निवडून आले आहेत. शिंदे साहेबांसोबत पहिलं तिकीट काढणारा हाच पहिला माणूस. माझा नंबर तर ३३ होता. गेल्यावेळी भाजप आणि आमचं लव मॅरेज तुटलं, काम अडकली, ब्रेक के बाद पुन्हा ‘आय लव्ह यू’ झालं आणि मला हेच खातं मिळालं, असंही पाटील यावेळी म्हणाले. आमच्यावर टीका करतात, गद्दारी केली. मात्र, मी शाळेची बॅग घेतली तेव्हापासून शिवसेना शिकलोय मी ३५ वर्ष ‘एक पक्ष एक झेंडा’ जगलोय.

पृथ्वीचा आकार बदलतोय, कारण दडलंय भारताच्या गर्भात; शास्त्रज्ञांची झोप उडाली
आम्ही उद्धव ठाकरेंना म्हटलं साहेब यांना परत बोलवा, नाराजी दूर करु. मात्र, महामंडलेश्वर १००० श्री.श्री.श्री संजय राऊत म्हणाले तुम्हाला जायचं तर तुम्ही ही जा, आम्ही उद्धव ठाकरेंना सांगून निघालो. ४० आमदार निघून जातात तुम्हाला काही वाटत नसेल तर नेतृत्व कमकुवत आहे, असं म्हणायला हरकत नाही. दगाफटका झाला असता तर आमच्या राजकारणाची भावपूर्ण श्रद्धांजली होती. आम्ही सट्टा खेळलो आम्ही आणि जिंकलो.

आता ती अंधारे नावाची बाई आली आहे. ती नेता आहे म्हणे, असो आमच्यावर आरोप होऊ द्या हो आम्ही काम करतोय आणि करत राहणार आहोत. आमचं चिन्ह म्हणजे “ढाल है बचाने को तलवार है लगाने को”. राजकारण शिकावे ते सत्तार आणि दानवेंकडून आम्ही ऐकलं भांडण आहे आणि इथं जेवताना पीस लो, रस्सा लो, आम्हालाही शिकवा बाबा हे राजकारण, असं म्हटल्यावर सभेत एकच हशा पिकला.

Grampanchayat Result: फक्त शिंदे गटाचाच बोलबाला; १७ पैकी ११ ग्रामपंचायतीवर विजय, ठाकरे गटाला मोठा धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here