nandurbar jilha parishad election: नंदूरबार जिल्हा परिषदेत सत्तांतर झालं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असूनही निकाल भाजपच्या बाजूनं लागला आहे. शिंदे गटाचा वचपा काढण्यासाठी उद्धव ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिला. त्यातच काँग्रेसचे पाच सदस्य फुटले. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ताबदल झाला.

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री के. सी. पाडवी यांची जिल्ह्यातील काँग्रेसवर ढिली झालेली पकड आणि असंतोषातूनच सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसला सत्तेबाहेर जावे लागले आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधित २४ सदस्य आहेत. तर भाजपची सदस्य संख्या २० इतकी आहे. मात्र उद्धव गट (६ सदस्य) आणि काँग्रेसच्या ५ सदस्यांनी भाजपच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळे परिषदेत सत्तांतर झालं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.