राहूल हा सेना दत्त पोलीस चौकी परिसरात राहतो. राहुल त्याच्या मित्रासोबत दुचाकीवर पुणे रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. त्याची ३ वाजून १५ मिनीटांनी ट्रेन नियोजित वेळवर सुटणार होती. मात्र, अलका चौकात पोलिसांनी त्याला अडवलं त्याची चौकशी केली असताना लायसन्स, गाडीचे पेपर सगळे ओके होते. पण त्याच्यावर आधीच कुठे तरी नियम मोडल्यामुळे जुना दंड भरलेला नसल्याचं चलन बाकी होतं.
मग पोलिसांनी त्याला ते चलन भरण्यास सांगितले. परंतु तेवढे पैसे त्या दोघांकडेही नव्हते. त्यांनी पोलिसांना विनंती केली आम्ही हे चलन नंतर भरु आमची ट्रेन आहे, तुम्ही सोडा. मात्र, पोलिसांनी अजून एक चलन काढलं आणि लायसन्स जप्त केले. एवढ्या सर्व नाट्यानंतर त्या दोघांची ट्रेनची वेळ निघून गेली आणि त्यानंतर विद्यार्थी पोलिसांवर चांगलाच संतापला.
राहुल धने हा थेट रस्त्यावर झोपून या घटनेचा निषेध करु लागला. राहुल म्हणाला सहा महिने मी घरी गेलो नव्हतो. माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे. माझ्याकडे तिकीट खरेदी करण्याचे पैसे नव्हते. पण पोलिसांच्या मुजोरीमुळे आता मी गावाला जाऊ शकत नाही. माझे कुटुंब आतुरतेने माझी वाट पाहत आहे. आता मी काय करु म्हणून आता मरेपर्यंत मी हिथेच झोपून राहणार आहे. एकंदरीतच पोलिसांची मुजोरी नेहमीप्रमाणे दिसून आली. या घटनेनंतर स्वतः पोलिसांनी त्याला विनंती करुन रिक्षात बसवून एका खासगी ट्रॅव्हल्समध्ये तिकीट काढून गावाला पाठवले.