आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर अशा अनेक पद्धती आहेत ज्याचा वापर केल्याने तुम्हालाही वीजबिल कमी येईल. डीडब्ल्यूच्या एका अहवालात दिल्लीतील रहिवासी अमित मेहता यांची गोष्ट सांगितली आहे. ज्यांनी आता विजेचं बिल पूर्णपणे कमी केलं आहे. खरंतर, दिल्लीच्या अमितने त्यांच्या घरात सोलर पॅनल लावलं आहे. त्यानंतर तो घरातील सर्व इलेक्ट्रिकल उपकरणे वापरतो, पण तरी त्याला बिल येत नाही. त्यांनी त्यांच्या घरात ५ kW चा सोलर पॅनल बसवला आहे आणि हा संपूर्ण सेटअप बसवण्यासाठी त्यांना २ लाख २५ हजार रुपये खर्च आला आहे.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अमितच्या घरचं वीजबिल ८ ते १० हजारांपर्यंत यायचं. पण मागच्या दीड वर्षांपासून त्याला शून्य रुपये बिल आलं आहे. अशात तो दोन लाखांच्या नफ्यात आहे. आता पुढच्या २० वर्षांपर्यंत त्यांना एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही.
किती फायद्याचं आहे सौर पॅनेल…
तुम्हालाही जर घरी सोलर पॅनेल बसवायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला खर्च करावा लागतो. पण काही काळानंतर तुम्हाला त्यातून बचत होत असल्याचं दिसेल. एकदा सोलार पॅनल बसवून २० वर्षांच्या विजेच्या संकटातून तुम्ही मुस्क होऊ शकता.