चंद्रपूर : राज्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता आणखी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून स्कॉर्पिओ वाहन उलटल्याची घटना आज ( १७ ऑक्टोबर )ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे.

Tips For Low Electric Bill : AC, पंखा, टीव्ही सगळं वापरलं तरी २० वर्ष शून्य रुपये येणार बिल, धमाकेदार आहे ‘ही’ आयडियाची कल्पना

chandrapur road accident


मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी आष्टी, गोंडपिपरी पोलीस दाखल झाले असून नदीत कोसळलेली स्कॉर्पिओ वाहन आणि चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. गोंडपीपरी इथून आष्टीकडे येणारे स्कॉर्पिओ वाहन वैनगंगा नदीच्या आष्टी पुलावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट नदीत पात्रात कोसळले.

यात चालकाचा जागीच मृत्यू झाला. हे वाहन नेमके कुणाच्या मालकीचे हे कळू शकले नाही. तर मृत वाहन चालकाचे नावही अद्यापपर्यंत कळू शकले नाही. गाडीत चालक हा एकटाच होता, अशी माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आष्टी व गोंडपीपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Grampanchayat Result : काँग्रेसच्या एका आमदाराने निवडणूक गाजवली, तब्बल ३९ ग्रामपंचायतींचा विजय खेचून आणला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here