नाशिक : नाशकातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर अशा चार तालुक्यातील १९४ ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाले असून निवडणुका झाल्यानंतर आज सकाळ पासून मत मोजणीला सुरवात झाली होती. आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची अंतिम निकाल हाती आला आहे. जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींपैकी ७ ग्रामपंचायती या पूर्वीच बिनविरोध झाल्याने १८७ ग्रामपंचायतींचा देखील निकाल हाती आला आहे.

नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला असून त्याखालोखाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने देखील जिल्ह्यात ४२ जागांवर विजय राखत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाला देखील चांगल्या जागा मिळाल्या असून भाजपला जोरदार धक्का बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील केंद्रात मंत्री असताना देखील भाजपला जिल्ह्यात पाहिजे तशा जागा मिळवता आलेल्या नाहीत.

Video : दिवाळीला घरी निघाला पण पोलिसांनी अडवल्यामुळे ट्रेन हुकली; तरुण संतापून रस्त्यावर झोपला अन्…
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सर्वाधिक ५१ जागा मिळाल्या असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला ४२ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला २३ जागा मिळाल्या आहेत. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या आहेत तर भाजपला अवघ्या १३ जागा मिळाल्या असून काँग्रेस पक्षाला ९ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेचे देखील नाशिक जिल्ह्यात एक ठिकाणी खाते उघडले आहे. याबरोबर इतर ३३ ग्रामपंचायतींवर अपक्षांनी सत्ता काबीज केली आहे.

गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यात तीन तालुक्यातील ८८ जागांच्या ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. यात देखील राष्ट्रवादीने गड शाबूत राखत सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. त्यानंतर पुन्हा आता जिल्ह्यातील चार तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व राखत राष्ट्रवादी आघाडीवर असून भाजपला जोरदार धक्का दिला आहे. तर काँग्रेस पक्षाला देखील नाशिक जिल्ह्यात आपले वर्चस्व राखता आलेलं नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी असून त्या पाठोपाठ शेवटच्या घटकात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुसंडी मारली आहे. एकंदरीत भाजप आणि शिंदे गटाच्या जागा सोडल्या तर नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीने सार्वधिक ग्रामपंचायतींवर आपले नाव कोरले आहे.

इमरान खान पोटनिवडणुकीत ६ ठिकाणी स्वत: जिंकले, शाहबाज शरीफ यांना धोबीपछाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here