राजस्थान काँग्रेसने बंडखोर नेते उपमुख्यमंत्री यांना उपमुख्यमंत्रिपदावरून, तसेच राजस्थान प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. या बरोबरच पायलट यांचे समर्थक विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. यानंतर पक्षाच्या कारवाईला सामोरे जाणारे बंडखोर सचिन पायलट यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्याचा छळ केला जाऊ शकतो, मात्र सत्याचा पराभव करता येत नाही, असे वक्तव्य सचिन पायलट यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईनंतर व्यक्त केली आहे.

राजस्थानातील गहलोत सरकारवर संकट निर्माण झाल्यापासून बंडखोर नेते सचिन पायलट कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या काही समर्थक आमदारांसह दिल्ली गाठल्यानंतर राजस्थानातील राजकीय हालचालींना वेग आला. सचिन पायलट यांची नाराजी उघड झाल्यानंतर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाही यश येऊ शकले नाही. यात राहुल गांधी, प्रियांका गांधी, पी. चिदंबरम, केसी वेणुगोपाळ या केंद्रीय नेत्यांचा समावेश होता.

बरखास्तीनंतर पायलट यांनी आपली ट्विटरवरील प्रोफाइल बदलले, काँग्रेसचा उल्लेख काढू टाकला

काँग्रेसने बंडखोर नेते सचिन पायलट यांची राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आणि राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्यानंतर सचिन पायलट यांनी आपल्या ट्विटर हँडलवरील काँग्रेसची ओळख डिलिट करून टाकली आहे. टोंक येथील आमदार इतकाच उल्लेख पायलट यांनी आता ठेवला आहे. (MLA from Tonk| Former Minister of IT, Telecom & Corporate affairs,GoI |Commissioned officer Territorial Army) तसेच त्यांनी आतापर्यंत कोणती मंत्रिपदे भूषविली आहेत, त्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलवर कायम ठेवला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here