पुणे : पुणे शहर आणि परिसराला सोमवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या तसंच पुणे-सोलापूर रस्त्यावर आकाशवाणी परिसरात झाड कोसळले. शहरात रात्री साडेनऊच्या सुमारास मुसळधार पावसास सुरूवात झाली होती. कोंढव्यातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसर, बिबवेवाडी-सुखसागरनगर भागातील अंबामाता मंदिर, कोंढवा परिसरातील एनआयबीएम रस्ता परिसरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांना या घटनांची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी तातडीने तेथे धाव घेतली. शहरात अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकूण १२ जणांची सुखरुप सुटका केली आहे.

मंगळवार पेठेतील स्वरुपवर्धिनीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटुंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना माहिती देताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील तीन लहान मुली, एक महिला आणि एक पुरूष (एकूण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले.

मोठी बातमी: संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने तातडीने मुंबईला रवाना

दुसरीकडे, कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी सात नागरिक पाण्यामधे अडकले होते. यावेळी पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी या सर्व जणांना सुखरुप बाहेर काढलं. मुसळधार पावसामुळे शहरातील बहुंताश रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले होती. पावसाचा जोर जास्त असल्याने शहरातील सर्व रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. तसंच काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्याचं पाहायला मिळालं.

कोणत्या परिसरात पाणी शिरले?

अग्निशमन दलाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्रासमोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलीस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कूल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक- गंज पेठ – भवानी पेठ या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here