मुंबई: भाजपचे विधान परिषदेचे आमदार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यासाठी निमित्त ठरलं आहे थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेलं एक ट्विट. हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं असून नेटकऱ्यांनी पडळकर यांची जोरदार खिल्ली उडवली आहे.

वाचा: ‘

गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. या निमित्त पडळकरांनी त्यांना ट्विटरद्वारे आदरांजली वाहिली. मात्र, आगरकरांना अभिवादन करताना त्यांनी लोकमान्य टिळकांचा फोटो शेअर केला. हे ट्विट सोशल मीडियात वाऱ्यासारखं व्हायरल झालं आणि पडळकरांवर तिरकस टीका-टिप्पणी सुरू झाली. चूक लक्षात येताच त्यांनी लगेचच हे ट्विट डिलिट केलं आहे. मात्र, त्यांच्या फोटोसह असलेल्या या ट्विटचे स्क्रीन शॉर्ट अजूनही सोशल मीडियात फिरत आहेत.

सध्या भाजपमधील धनगर समाजाचा चेहरा असलेले पडळकर विधानसभा निवडणुकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आले होते. बारामतीमधून अजित पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवल्यानं पडळकरांचं नाव राज्यात पोहोचलं होतं. बारामतीमधून त्यांचा दणदणीत पराभव झाल्यानंतरही भाजपनं त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली. त्यामुळं त्यांचं राजकीय वजन वाढलं. त्यातच पंढरपूरमध्ये अलीकडं झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. पडळकरांच्या या वक्तव्यामुळं भाजपलाही बॅकफूटवर जावं लागलं होतं. त्यानंतर आता ते पुन्हा चर्चेत आले आहेत.

वाचा:

पडळकरांच्या आजच्या ट्विटमुळं नेटकऱ्यांनी भाजपलाही लक्ष्य केलं आहे. ‘टिळक व आगरकर यांच्यातील फरक न कळणारे आमदार झाले आहेत. भाजप आमदार झाले की डोक्यावर परिणाम होतो याचे हे उत्तम उदाहरण,’ असं काहींनी म्हटलं आहे. पडळकरांनी टिळक-आगरकर हा ऐतिहासिक वाद संपवलाय, अशी खोचक टिप्पणीही काहींनी केलीय.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here