Maharashtra Politics | राज ठाकरे यांच्या पत्रानंतर अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली होती. त्यानंतर शरद पवार यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह धरला होता. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून जाणे, हे महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संकेताला धरून आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली होती.

हायलाइट्स:
- खोपकर यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा
- भाजपने माघार घेतल्याचे श्रेय सर्वस्वी राज ठाकरे यांचे
अंधेरी पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहले होते. त्यांच्या या पत्रामुळे २४ तासांमध्ये अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे बदलली होती. रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके बिनविरोध निवडून जाणे, हे महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संकेताला धरून आहे. त्यामुळे भाजपने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती. या पत्रानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून मुरजी पटेल यांना माघार घेण्याचे आदेश दिले होते.
भाजपच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनीही भाजपच्या भूमिकेचं स्वागत केले होते. अंधेरी (पूर्व) पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार. उमद्या राजकीय संस्कृतीसह राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी हीच आमची धारणा, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
मुरजी पटेलांच्या कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथून मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अंधेरीत मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. ‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणांनी अंधेरी पूर्वचा परिसर दणाणून गेला होता. इतक्या दिवसांच्या प्रचारानंतर मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे, ही बाब अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे मुरजी पटेल यांचा एक कार्यकर्ता ओक्साबोक्शी रडायला लागला. तर अन्य एका कार्यकर्त्याने ‘सगळे चोर आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.