BIhar crime news: बिहारच्या भागलपूर येथील मधुरा सिमानपूर गावात एक चक्रावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. आता हा बनाव उघडकीस आला आहे. यामध्ये त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली.

 

bihar death
भागलपूर: बिहारच्या भागलपूर येथील मधुरा सिमानपूर गावात एक चक्रावून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपीनं स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला. आता हा बनाव उघडकीस आला आहे. यामध्ये त्याच्या वडिलांनी त्याला साथ दिली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी सोमवारी लपूनछपून न्यायालयात पोहोचला आणि त्यानं आत्मसमर्पण केलं.

भागलपूरमधील इशीपूर बाराहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शिक्षक नीरज मोदीवर विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. शिक्षेपासून सुटका व्हावी यासाठी त्यानं स्वत:च्या मृत्यूची खोटी कहाणी रचली. त्यानं वडिलांना अंत्यसंस्काराचं नाटक करायला लावलं. पोलीस आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी चितेवरून झोपून फोटो काढले. त्याच्या वडिलांनी ते फोटो विशेष पॉस्को न्यायालयात सादर केले. यानंतर बाप, लेक बेपत्ता झाले. आरोपीचा मृत्यू झाल्याचं समजून पोलिसानी प्रकरणाचा तपास बंद केला. त्यामुळे न्यायालयातील फाईल बंद करण्यात आली.
VIDEO: दोन प्रवाशांमध्ये वाद; एकानं दुसऱ्याला धावत्या ट्रेनमधून थेट खाली फेकलं
शिक्षक नीरज मोदीवर १४ ऑक्टोबर २०१८ रोजी विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप झाला. प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं. मुलाला शिक्षा होऊ नये म्हणून वडील राजाराम मोदींनी त्याच्या मृत्यूची खोटी कहाणी रचली. नीरज चितेवर झोपला. त्याच्या अंगावर पांढरी चांदरी अंथरण्यात आली. यानंतर त्याचे फोटो काढण्यात आले. विशेष म्हणजे राजाराम यांनी चितेसाठी कहलगाव स्मशान घाटावरून लाकडं खरेदी केली आणि त्याची पावतीही घेतली. याच पावतीचा आधार घेत त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं. न्यायालयात शपथपत्र सादर केलं. त्यामुळे न्यायालयातील खटला बंद झाला.
तरुणी बोलेना; संतापलेल्या तरुणानं धावत्या ट्रेनसमोर ढकललं; वडिलांना समजताच टोकाचं पाऊल उचललं
आरोपीच्या या नाटकाचा पर्दाफाश पीडितेच्या आईनं केला. आरोपी नीरज जिवंत असल्याचं समजताच ब्लॉक विकास अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. राजाराम यांनी मिळवलेलं प्रमाणपत्र बोगस असल्याची माहिती त्यांनी या अर्जातून दिली. बीडीओंनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि सत्य उघडकीस आलं. नीरज मोदीचे वडील राजारामच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. नीरजचं मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here