सुनील नलावडे । रत्नागिरी

रत्नागिरीतील हरहुन्नरी कलाकार अशी ओळख असलेले प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर यांना संसर्ग झाल्याने त्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मात निधन झाले आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. (Fashion Photographer )

वाचा:

संजीव साळवी नुसते कलाकारच नव्हे तर निवेदक, उत्तम गायक, नकलाकार व कवीही होते. फोटोग्राफीत त्यांना त्यांचे वडील दिवंगत हरीश्चंद्र साळवी यांचा वारसा लाभला होता. स्मृती स्टुडिओच्या माध्यमातून ते परिचित होते. साळवी कुटुंबाचं फोटोग्राफी बरोबरच नाट्य अभिनय क्षेत्रातही नाव आहे. त्यांची बहीण नाट्य संगीत क्षेत्रातील कलाकार म्हणून रत्नागिरीकरांना परिचित आहे. कला क्षेत्रातिल यशात त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा आहे. त्याही कलेच्या क्षेत्रातील जाणकार आहेत.

वाचा:

रत्नागिरीतील यशानंतर आपल्या कलेचा विस्तार करताना त्यांनी गोव्यात पाऊल टाकले. तिथे मालिकांच्या शूटिंगचं खूप काम त्यांनी केलं. कोकण सुंदरी यासारख्या सौंदर्यस्पर्धेचं निवेदन यासह कलाकारांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम संजीव साळवी करायचे. त्यामुळे ते कला व सांस्कृतिक क्षेत्रात लोकप्रिय झाले होते. फोटाग्राफी क्षेत्रात त्यांनी अनेक युवकांना मार्गदर्शन कले. संजिव साळवी यांच्या निधनानंतर जिल्हाभरातील फोटोग्राफर संघटनांनी श्रद्धांजली वाहून आपले स्टुडियो बंद ठेवले. संजीव साळवी यांनी नुकतेच युट्यूबवर ” ” चॅनल सुरू करून अनेक कलाकारांना सांस्कृतिक दालन मिळवूनन दिले होते. संजीव साळवी यांच्या पश्चात पत्नी, मुले, फोटोग्राफर भाऊ व बहिणी असा परिवार आहे.

वाचा:

पाडगावकर म्हणाले होते, तुमच्या कॅमेऱ्याला माझा सलाम!

संजीव साळवी हे फोटोग्राफी क्षेत्रातील एक मोठे नाव होते. अनेक दिग्गजांनी त्यांच्या फोटोग्राफीचे कौतुक केल होते. यात कवीवर्य दिवंगत यांनी खास पत्रसंदेशाद्वारे साळवी यांची स्तुती केली होती. साळवी यांनी महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे छायाचित्रण केले होते. त्यानंतर त्यांनी त्याचा अल्बम पाडगावकर यांना पाठवला होता. त्यावर पाडगावकर यांनी खास अभिप्राय दिला होता. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारंभाच्या प्रसंगी तुम्ही तुमच्या जादूगार कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्रांचा अल्बम मिळाला. आभारी आहे. त्याची मला सुंदर सोबत राहील. ही छायाचित्रे पाहताना या समारंभाचे अनेक क्षण मी पुन्हा जगतो आहे, असेच मला वाटले. तुमच्या कॅमेऱ्याला माझा सलाम’, अशी खास दाद पाडगावकर यांनी साळवी यांना दिली होती.

वाचा:

रत्नागिरी बातमी | Ratnagiri News | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here