नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाकूर म्हणाले की, मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये ११० रुपये, बार्ली १०० रुपये, हरभरा १०५ रुपये, मसूर ५० रुपये, मोहरी ४०० रुपयांनी आणि करडईमध्ये २०९ रुपयांची वाढ केली आहे.

पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट! दिवाळीच्या तोंडावर किसान योजनेचे १२वा हप्ता खात्यात जमा
या वाढीनंतर आता गव्हाच्या एमएसपीमध्ये २१२५ रुपये प्रति क्विंटल, बार्लीच्या एमएसपीमध्ये १७३५ रुपये प्रति क्विंटल, हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये ५३३५ रुपये प्रति क्विंटल, मसूरच्या एमएसपीमध्ये ६,००० रुपये प्रति क्विंटल, मोहरीच्या एमएसपीमध्ये ५४५० रुपयांची आणि एमएसपीमध्ये ५४५० रुपयांची वाढ झाली आहे. करडईचे भाव ५६५० रुपये प्रति क्विंटल झाले.

केंद्रीय पेन्शनधारकांना सरकारची भेट, DA नंतर आणखी एका भत्त्यात वाढ, पाहा कोणाला फायदा मिळणार
मसूरचा सर्वाधिक वाढलेला एमएसपी
२०२३-२४ च्या पणन सत्रासाठी सर्व रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळाने मसूरच्या कमाल एमएसपीमध्ये वाढ केली असून मसूरचा एमएसपी प्रति क्विंटल ५०० रुपयांनी वाढवून ६,००० रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे.

कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारकडून रब्बी आणि खरीप हंगामात वर्षातून दोनदा एमएसपी (किमान आधारभूत किंमत) जाहीर केली जाते. ऊसाची आधारभूत किंमत ऊस आयोग ठरवतो.

सर्वसामान्यांना दिलासा! दिवाळीआधी आंघोळीचे साबण झाले स्वस्त, जाणून नवीन दर
शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय २०१८-१९ च्या अर्थसंकल्पाच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी घेण्यात आला आहे. यात म्हटले की MSP संपूर्ण भारतातील उत्पादन खर्चाच्या १.५ पट निश्चित केला जाईल.

पीएम किसानचा हप्ता सोमवारी रिलीज
यापूर्वी सोमवारी सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान योजनेचा १२वा हप्ता जारी केला. पंतप्रधानांनी सोमवारी एका कार्यक्रमात योजनेच्या १२व्या हप्त्यातील १६ हजार कोटी रुपये जारी केले. आता २,००० रुपयांचा हप्ता (पीएम किसानचा १२वा हप्ता) दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाईल. यासोबतच पीएम मोदींनी सोमवारी वन नेशन वन फर्टिलायझर उपक्रमाचा शुभारंभ केला तर ६०० प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही उद्घाटन केले.

334 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here