मुंबई: राजस्थानमधील युवा काँग्रेस नेते यांची पक्षानं सर्व पदावरून हकालपट्टी केल्यानं काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चांगलेच ढवळून निघालं आहे. काँग्रेसमधील या घडामोडींचे पडसाद अन्य राज्यांतही उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच तर्कवितर्कांमुळं महाराष्ट्रातील एका तरुण काँग्रेस नेत्याचं नावही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.

वाचा:

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी पहिला धक्का दिल्यानंतर काँग्रेसमधील तरुण तुर्कांच्या नाराजीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. काँग्रेसनं हा धक्का पचवून पुढं वाटचाल सुरू केली असतानाच राजस्थानमध्ये पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले. भाजपशी संधान साधून त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना आव्हान दिले. काँग्रेसनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो फोल ठरला. अखेर कठोर पाऊल उचलत काँग्रेसनं पायलट यांची आज उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष या दोन्ही पदांवरून हकालपट्टी केली.

वाचा:

राजस्थानमधील ‘ऑपरेशन कमळ’ यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्राचा नंबर असल्याच्या चर्चा कालपासून सुरू झाल्याच होत्या. मात्र, भाजपच्या वाटेवर असलेल्या काही नेत्यांचीही नावं आता पुढं येत आहेत. त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचं नाव आहे. देवरा यांचं नाव आज ट्विटरवर ट्रेंड होत होतं.

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मंत्री मुरली देवरा यांचे चिरंजीव आहेत. लोकसभेत दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलेले मिलिंद हे मनमोहन सिंग सरकारच्या काळात केंद्रात राज्यमंत्री होते. २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते फारसे कुठेही सक्रिय नाहीत. त्यातच मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणामुळं ते नाराज असल्याचंही बोललं जातं. देवरा यांनी याआधी अनेकदा पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका मांडली आहे. भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी हे मोदी सरकारला घेरत असताना मिलिंद देवरा यांनी वेगळी भूमिका मांडली होती. ‘चीनच्या प्रश्नावरून सुरू असलेली राजकीय चिखलफेक दुर्दैवी आहे. चीनच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकजूटीचे दर्शन घडवायला हवे,’ असं त्यांनी म्हटलं होतं.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here