Crime news: उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. बलात्काराचा खोटा आरोप आणि त्यामुळे सहन करावा लागणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. जीवनयात्रा संपवण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली. एक व्हिडीओदेखील तयार केला. एक तरुणी आणि तिच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तरुणानं चिठ्ठीत नमूद केलं.

 

up suicide
पिलिभीत: उत्तर प्रदेशच्या पिलिभीतमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. बलात्काराचा खोटा आरोप आणि त्यामुळे सहन करावा लागणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. जीवनयात्रा संपवण्यापूर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहिली. एक व्हिडीओदेखील तयार केला. एक तरुणी आणि तिच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तरुणानं चिठ्ठीत नमूद केलं. तरुणाच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणी, तिचे वडील, भाऊ यांच्यासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पिलिभीतमधील भौरियाई गावात वास्तव्यास असलेल्या नरेंद्रनं ८ ऑक्टोबरला शेतात आत्महत्या केली. त्यावेळी कोणतीही चिठ्ठी समोर आली नव्हती. मात्र तीन दिवसांनंतर नरेंद्रच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली. नरेंद्रचे वडील सेवाराम यांनी चिठ्ठी वाचून तरुणी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा नोंदवला. माझ्या मुलानं आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आणि त्यात त्यानं तरुणी आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरल्याचं सेवाराम यांनी सांगितलं.
VIDEO: दीड हजारांची उधारी परत केली नाही; तरुणाला स्कूटरला बांधलं, २ किलोमीटर पळवलं
तरुणीनं नरेंद्रवर बलात्काराचा आरोप केला होता. तरुणीनं मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. शारीरिक संबंध ठेवले. ती माझ्या मागे लागली होती. तिनं केलेले बलात्काराचे आरोप खोटे आहेत, असं नरेंद्रनं चिठ्ठीत नमूद केलं आहे. नरेंद्रनं चिठ्ठीतून कुटुंबाची माफी मागितली असून तरुणीच्या कुटुंबासोबत समेट करू नका असं आवाहन केलं आहे.
अचानक खात्यांमध्ये जमा होऊ लागले १५० कोटी रुपये; सहकारी बँकेचे अधिकारी धास्तावले
सेवाराम यांनी १२ ऑक्टोबरला तरुणी आणि अन्य व्यक्तींविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तरुणीचे कुटुंबीय त्रास देत असल्याचा दावा त्यांनी केला. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत. नरेंद्रनं लिहिलेल्या चिठ्ठीची सत्यता पडताळली जात आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here