नालगोंडा: तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात तपासणीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या कारमध्ये १ कोटी रुपये सापडले. चेलमेडा चेक पोस्टवर तैनाता असलेल्या पोलिसांनी भाजप नेत्याकडे पैशांचा हिशोब मागितला. मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. यानंतर पोलिसांनी रोकड जप्त केली. येत्या ३ नोव्हेंबरला नालगोंडाच्या मुनुगोडे विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्याआधी भाजप नेत्याच्या कारमधून रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

नालगोंडाच्या पोलीस अधीक्षक रेमा राजेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑक्टोबरला जिल्हा पोलिसांचं पथक नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होतं. त्यादरम्यान दुपारी ३ वाजता चेलमेडा चेक पोस्टवर एक टाटा सफारी रोखण्यात आली. ही कार एस. वेणू नावाची व्यक्ती चालवत होता. तो तेलंगणाच्या करीमनगरच्या भाजप नगरसेविका सी. जे. वेणू यांचा पती आहे.
चिता रचली, लेकाला झोपवले, फोटो काढले; वडिलांनी रचला लेकाच्या मृत्यूचा बनाव; कारण…
पोलीस पथकानं भाजप नेत्याच्या कारची तपासणी केली. त्याला डिक्की उघडण्यास सांगितलं. त्यात एक मोठी बॅग सापडली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड होती. ही रक्कम मोजण्यात आली. ती एक कोटींच्या घरात होती. वेणुला याबद्दल विचारणा करण्यात आली. मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्याला कोणतीही कागदपत्रं दाखवता आली नाहीत. त्यामुळे ही रक्कम बेहिशेबी असल्याचं मानून पोलिसांनी ती जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाला पाठवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here