दोन दिवस शेअर्सची सातत्याने घसरण
टाटा एलेक्सीच्या शेअरची किंमत १७ ऑगस्ट २०२२ रोजी गेल्या दोन दिवसांच्या घसरणीसह त्याच्या विक्रमी उच्चांकी रु. १०,७६० वरून ३२ टक्क्यांनी सुधारली. यापूर्वी २१ जून २०२२ नंतरच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होता. त्या तुलनेत, S&P बीएसई सेन्सेक्स दुपारी १२:१५ वाजता १.१ टक्क्यांनी वधारला. दोन दिवसांत निर्देशांक दोन टक्क्यांनी वधारला आहे.
कंपनीचे तिमाही निकाल
चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात ६ टक्क्यांनी घट झाली आहे तर, करपूर्व नफा सुमारे २१९ कोटी रुपये होता. त्यातही तिमाही आधारावर ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 7७६३ कोटी रुपये होते, जे तिमाही आधारावर ५ टक्के आणि वार्षिक आधारावर २८ टक्के वाढ दाखवते. करानंतरच्या नफ्यात वर्षभरापूर्वीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टाटा एलेक्सीबद्दल मॉर्गन स्टॅनलीचे मत
अमेरिकेतील ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने आपले मत मांडताना टाटा एलेक्सीला अंडरवेट रेटिंग दिले आहे. त्यांनी या शेअरचे लक्ष्य ५,८०० रुपये प्रति शेअर निश्चित केले आहे. ब्रोकरेज हाऊसने म्हटले की मूल्यांकनामुळे त्यांनी अंडरवेटचे रेटिंग दिले आहे.
शेअर बाजार तेजीत बंद
देशांतर्गत शेअर बाजार मंगळवारी सलग तिसऱ्या सत्रात तेजीसह बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ५४९.६२ अंकांच्या किंवा ०.९४ टक्क्यांच्या वाढीसह ५८,९६०.६० वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी देखील १७८.०५ अंकांच्या किंवा १.०३ टक्क्यांच्या वाढीसह १७,४८९.८५ अंकांवर बंद झाला. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कोणत्याही लक्षणीय अस्थिरतेशिवाय ८२.३६ वर बंद झाला. मागील सत्रात तो ८२.३५ च्या पातळीवर बंद झाला होता.