Authored by नयन यादवाड | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Oct 2022, 6:15 pm
Kolhapur News : साताऱ्यात गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा सुरु होत्या. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसांपासूनच कोल्हापूर पोलिसांनी सांघीक आणि व्ययक्तिक आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी स्पर्धेतील वर्चस्व आपले कायम राखले.

हायलाइट्स:
- पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा डान्स व्हायरल
- झिंगाट या गाण्यावर डान्स व्हायरल
- व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला
साताऱ्यात सहा दिवसांपासून कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा सुरु होत्या. या स्पर्धेच्या पहिल्या दिवसांपासूनच कोल्हापूर पोलिसांनी सांघीक आणि व्ययक्तिक आघाडी घेतली होती. शेवटपर्यंत कोल्हापूर पोलिसांनी स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले. तर पुरुष आणि महिला गटांमध्ये कोल्हापूर पोलिसांनी विजेतेपद पटकावले.
पोलीस कवायत मैदानात बक्षीस वितरण पार पडल्यानंतर पोलिसांच्या बँड पथकाने झिंगाट हे गाणं वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनाही आपल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी अधीक्षक बलकवडे यांना खांद्यावर बसूनच ठेका धरला. त्यांच्याभोवती इतर पोलीस कर्मचारीही डान्स करु लागले. या डान्सचा व्हिडिओ काहींनी शूट केल्यानंतर सोशल मीडीयावर व्हायरल केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.