Omicron’s New Sub-Variant In India : भारताचा सगळ्यात मोठा सण दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. करोनाच्या जीवघेण्या धोक्यामुळे अगदी २ वर्षांनी लोक उत्साहाने सण साजरा करणार आहेत. पण यावर आता पुन्हा एका संकटाचा धोका आहे. करोना विषाणूच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. करोनाची वाढती प्रकरणे रोखण्यासाठी महाराष्ट्र, केरळ या राज्यांनीही अॅडव्हायजरी जारी केली आहे. अशात, देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांत करोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी करोनाचे ११५ नवीन रुग्ण आढळून आले आणि शनिवारी १३५ नवीन रुग्ण आढळले. सध्या दिल्लीत ४२९ करोनाही सक्रिय प्रकरणं आहेत, ज्यामध्ये ३२९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी सोडला अंधेरीचा गड, का केली तलवार म्यान? वाचा INSIDE STORY

हाती आलेल्या अहवालांनुसार, कोविड-१९ च्या ओमिक्रॉन प्रकाराचा नवीन प्रकार भारतातहा आला आहे. Omicron च्या नवीन सब-व्हेरियंटचे नाव BA.5.1.7 आहे. हा नवीन प्रकार इतर प्रकारांपेक्षा वेगाने पसरत आहे आणि जर निष्काळजीपणा केला गेला तर कोविड संसर्गाची प्रकरणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही तज्ञांनी दिला आहे.

भारतातील गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने BF.7 उप-प्रकारचे पहिले प्रकरण शोधले. नवीन प्रकाराने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि बेल्जियममध्ये देखील आपला फैलाव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या देशांमध्ये नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अशात आता हा नवा जीवघेणा प्रकार भारतातही आपला फैलाव वाढवेल, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हा नवा सब-व्हेरिएंट लस घेतलेल्या आणि चांगली प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकतो. दिवाळीचा सर्वात मोठा सण समोर आहे. यामुळे बाजारपेठेत सर्वत्र गर्दीचे वातावरण आहे. दुसरीकडे, थंडीच्या मोसमामुळे विषाणू आणखी वेगाने पसरू शकतो. अशा परिस्थितीत कोणीही मास्क घालणे सोडू नये, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यासोबतच, लक्षणे दिसू लागल्यावर तुम्ही ताबडतोब स्वतःला वेगळे केले पाहिजे.

धक्कादायक! पतीकडून थेट ‘बायको अदला-बदलीची ऑफर’, रोज वेगळ्या मित्रासोबत संबंध ठेवायचे अन्…
काय आहे नव्या सब-व्हेरिएंटची लक्षणं…

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप लसीकरण (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराची लक्षणे देखील कोविड-१९ प्रमाणे आहेत. पण शरीरातील वेदना हे याचं मुख्य लक्षण आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात बर्याच काळापासून वेदना होत असेल तर त्याला कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. याशिवाय घसा खवखवणे, थकवा येणे, कफ आणि नाक वाहणे ही देखील या उपप्रकाराची लक्षणे असू शकतात.

भारताच्या लोकसंख्येमध्ये ३-४ आठवड्यांत पसरू शकतो हा नवा आजार…

डॉ. अरोरा हे म्हणाले की, “काळजी न घेतल्यास कोविड-१९ची पुढची लाट भारतात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सणासुद जोरात सुरू आहे आणि बाजारपेठांमध्ये लोकांची मोठी गर्दी आहे. असेच चालू राहिल्यास पुढील ३-४ आठवड्यांत हा विषाणू अधिक वेगाने पसरू शकतो” असंही दे म्हणाले.

कोरी करकरीत कार घेऊन मुंबई-गोवा फिरला अन् आता खातोय जेलची हवा; वाचा काय घडलं नेमकं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here