snake stuck in bikes speedometer: मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. एका व्यक्तीला बाईकमधून वेगळाच आवाज येत होता. त्यानं आवाज नीट ऐकला. साप फुत्कार टाकतेवेळी येणारा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. व्यक्तीनं स्पीड मीटर पाहिला. तो पाहून त्याला धक्काच बसला. कारण स्पीड मीटरच्या काचेखाली एक नागीण जाऊन बसली होती.

 

snake video
नरसिंहपूर: मध्य प्रदेशच्या नरसिंहपूर जिल्ह्यात एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. एका व्यक्तीला बाईकमधून वेगळाच आवाज येत होता. त्यानं आवाज नीट ऐकला. साप फुत्कार टाकतेवेळी येणारा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. व्यक्तीनं स्पीड मीटर पाहिला. तो पाहून त्याला धक्काच बसला. कारण स्पीड मीटरच्या काचेखाली एक नागीण जाऊन बसली होती. नागिणीची सुखरुप सुटका करून तिला जंगलात सोडण्यात आलं.

नरसिंहपूरच्या बरहाटामध्ये वास्तव्यास असलेला नझीर बाईकवरून कामाला जाण्यासाठी निघाला. तितक्यात त्याला साप फुत्कार टाकत असल्याचा आवाज ऐकू आला. त्यावेळी त्याचं लक्ष स्पीड मीटरवर गेलं आणि त्यानं बाईक एका जागी उभी केली. आसपासचे लोक बाईकजवळ जमले. त्यांनी स्पीड मीटरवर हात मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे आत असलेल्या नागिणीनं हालचाल सुरू केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नझीरनं रात्री बाईक घराबाहेर उभी केली होती. त्यावेळी नागिण स्पीड मीटरच्या भागात जाऊन बसली. आज सकाळी ६ च्या सुमारास नझीर खान यांना कामासाठी जायचं होतं. त्यावेळी नझीर यांना फुत्काराचा आवाज ऐकू आला. बाईकच्या स्पीड मीटरमध्ये एक नागिण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते पाहून नझीर यांना आश्चर्याचा धक्का बसला.
चेक पोस्टवर पोलिसांनी भाजप नेत्याची कार रोखली; डिक्कीत एक कोटी सापडले; विचारल्यावर म्हणतो…
नझीर खान यांनी याची माहिती कुटुंबासह इतरांना दिली. आसपासच्या लोकांनी नागिणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आलं. मीटरची काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर नागिणीला बाहेर काढण्यात यश आलं. गावापासून दूर असलेल्या जंगलात तिला सोडून देण्यात आलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here