मुंबई: एनसीबीच्या विशेष तपास पथकानं बॉलिवूड अभिनेत्रा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या दिल्लीतील मुख्यालयाला अहवाल पाठवला आहे. या प्रकरणाचा तपास नीट झाला नसल्याची माहिती या अहवालात असल्याचं सुत्रांनी सांगितलं. जे अधिकारी त्यावेळी काम करत होते, तेच आताही कार्यरत आहेत. त्यांच्या कामात अनेक त्रुटी होत्या. त्या तपासातून पुढे आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

पुरेसे पुरावे नसतानाही या प्रकरणात तपास सुरू होता आणि प्रकरण पुढे रेटण्यात येत होतं, अशी माहिती एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्यानं दिल्याचं वृत्त एबीपी न्यूजनं दिलं आहे. या प्रकरणात ६५ जणांचे जबाब ४ वेळा नोंदवण्यात आले. कारण जबाब नोंदवणाऱ्या व्यक्ती त्यांचे जबाब सातत्यानं बदलत होत्या. त्यामुळे अनेकांचे जबाब कॅमेऱ्यावर रेकॉर्ड करण्यात आले.
शेजारच्या घरातून दुर्गंधी येतेय! पोलिसांना कॉल, घटनास्थळ गाठलं, दरवाजा तोडला अन् मग…
इतर प्रकरणांच्या तपासातही त्रुटी असल्याचं तपासादरम्यान पथकाला आढळून आलं. या सर्व प्रकरणांचा अहवाल दिल्लीला पाठवण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये पैशांचे व्यवहार झाले की नाही, याचा तपास सुरू आहे. या दृष्टीनं सुरू असलेला तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. कारण तक्रारकर्त्यांनी त्यांचा जबाबच बदलला आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
चिता रचली, लेकाला झोपवले, फोटो काढले; वडिलांनी रचला लेकाच्या मृत्यूचा बनाव; कारण…
आर्यन खानला जाणूनबुजून टार्गेट करण्यात आलं होतं. पण तसं का करण्यात आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती अहवालात आहे. एनसीबीच्या तपास पथकाला या प्रकरणात ७ ते ८ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. याच अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका असलेली आणखी दोन प्रकरणंदेखील समोर आली आहेत. एनसीबीच्या बाहेरच्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मागण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here