मुंबई : माझ्या पक्षाचं नाव गोठवलं, चिन्ह गोठवलं आणि निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला. आपल्याला मनस्ताप द्यायचा, त्रास द्यायचा, शिवसेना संपवायची या हेतूने सगळं करण्यात आलं. पण शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तरी मशाल घेऊन आपण पुढे जात आहोत. धनुष्यबाण रामाचा होता, त्या धनुष्यबाणाच्या मदतीनेच रावणाचा वध रामाने केला. आता अन्यायाला जाळणारी आणि अंधारात वाट दाखवणारी मशाल आपल्याकडे आहे ती घेऊन पुढे जात काम करू, असा विश्वास कार्यकर्त्यांच्या साथीने उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बुलडाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मशाल हाती घेत आम्ही कायमस्वरुपी तुमच्यासोबत राहू, असा विश्वास उपस्थित शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना दिला. झुकेंगे नही लडेंगे, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणांनी शिवसैनिकांनी ‘मातोश्री’चा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

गद्दारांनी कितीही आमिषं दाखवली, पण राजन साळवी खंबीरपणे आपल्यासोबत, उद्धव ठाकरेंकडून कौतुक
लवकरच मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आगामी काही दिवसांमध्ये मी बुलढाण्यातही येणार आहे आणि तिथे सभा घेणार आहे. पहिल्यात निवडणुकीत मशालीची ताकद दिसली. अंधेरीत पराभव दिसला की माघार घेतली. त्यांना शिवसेना संपवायची होती. पण शिवसेना एक अंगार आहे. ती कधीच संपणार नाही. जिथे अंधार असेल तिथे आपली मशाल जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राजन साळवी यांच्या पक्षनिष्ठेचं ठाकरेंकडून कौतुक

गद्दारांनी कितीही आमिषं दाखवली, पण राजन साळवी खंबीरपणे आपल्यासोबत आहेत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राजापूरचे आमदार राजन साळवी यांचं कौतुक केलं. गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केली. पण त्यांच्या छाताडावर नाचून आपण भगवा फडकवू, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here