कोल्हापूर: महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक काही दिवस तरी लांबणार याची खात्री असतानाही आपली तयारी असावी म्हणून सर्वच इच्छूकांनी बार भरण्यास सुरुवात केली आहे. सध्या महापालिकेत महाविकास आघाडीचीच सत्ता असली तरी आगामी निवडणूक मात्र सर्व पक्ष एकमेकांविरोधात स्वतंत्रपणे लढण्याचीच चिन्हे आहेत. जागा वाटपातील अडथळे दूर करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरण्यात येणार असून निवडणुकीनंतर मात्र पुन्हा स्थापन करण्याच्या हालचाली आतापासूनच सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काही प्रभागात छुपी युती करत ही आघाडी आणि ताराराणी आघाडीला आव्हान देण्याची शक्यता आहे. ( ‘s Strategy For )

वाचा:

कोल्हापूर महापालिकेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. राज्यात ही आघाडी स्थापन होण्याच्या साडेचार वर्षे आधीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष महापालिकेत एकत्र आले. राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता असतानाही या महापालिकेत शिवसेना भाजप सोबत न जाता दोन्ही काँग्रेससोबत राहिली. भाजपला महापालिकेत सत्ता स्थापनेचा चमत्कार करण्यापासून सेनेने रोखले. नोव्हेंबरमध्ये विद्यमान सभागृहाची मुदत संपत आहे. यामुळे नव्या सभागृहाच्या स्थापनेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. सध्याच्या हालचाली पाहता या निवडणुका दोन तीन महिने तरी लांबणीवर पडतील, अशी शक्यता आहे. तोपर्यंत महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होणार हे जवळजवळ निश्चित आहे. निवडणूक कधीही होवो, आपण तयार असायला हवे असे म्हणत इच्छूकांनी आपली तयारी सुरू केली आहे. यामुळे करोनाच्या कहरमध्येही राजकीय हालचाली थांबल्या नाहीत.

गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले. निकालानंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आले. शिवसेनाही त्यांच्या सोबत गेली. भाजप व ताराराणी आघाडीची युती होती. आताही हीच युती कायम राहणार हे नक्की आहे. यामुळे ८१ प्रभागात जागा वाटप करून ही युती निवडणूक लढवेल. त्यांना जागा वाटपात फारशी अडचण येणार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

वाचा:

महापालिकेत काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची देखील चांगली ताकद आहे. यामुळे या दोन्ही पक्षांकडे इच्छूक उमेदवार मोठ्या संख्येने असतील. नाराज उमेदवारांना संधी देण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ ही नवी आघाडी स्थापन करण्यात आली आहे. पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री हे दोघेही आपापल्या पक्षाची ताकद वाढावी यासाठी प्रयत्न करतील यामध्ये शंका नाही. यातून दोघात धूसधूस होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेची ताकद असली तरी ती गटातटात विभागली गेली आहे. या तीन पक्षांची निवडणूक पूर्व आघाडी होण्यात अडचणी आहेत. जागा वाटप करताना सर्वच पक्ष जादा प्रभागावर हक्क सांगतील, यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार नाही. प्रत्येक प्रभागात इच्छूकांची संख्या मोठी आहे. यामुळे आघाडी झाली तर उमेदवारी द्यायची कुणाला हा मोठा प्रश्न नेत्यांना पडणार आहे. यातून नाराजी वाढेल. याचा फायदा भाजप आणि ताराराणी आघाडीला होण्याची शक्यता आहे, यामुळे विरोधकांना प्रबळ उमेदवार मिळू नये यासाठी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार हे नक्की आहे. काही प्रभागात मात्र छुपी आघाडी होईल. ज्या पक्षाचा प्रबळ उमेदवार असेल, त्याला मदत करण्याची भूमिका घेतली जाईल. हा फॉर्म्युला गत निवडणुकीत देखील वापरण्यात आला होता. तीच पद्धत पुन्हा वापरणार हे जवळजवळ नक्की आहे.

वाचा:

धुरा यांच्या खांद्यावर

काँग्रेस: पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव
राष्ट्रवादी: ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, राजेश लाटकर
भाजप: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, अमल महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे
ताराराणी आघाडी: माजी आमदार महादेवराव महाडिक, स्वरूप महाडिक
शिवसेना: खासदार संजय मंडलिक, राजेश क्षीरसागर, विजय देवणे, संजय पवार, रविकिरण इंगवले

विद्यमान सभागृहातील बलाबल
काँग्रेस- ३०
ताराराणी आघाडी- १९
राष्ट्रवादी पक्ष- १५
भाजप- १३
शिवसेना- ४

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here