सध्या शहरात जमीन भागातून येणारी भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. शेतातून भाजीपाला कसाबसा आणला जात आहे. परंतु, त्यास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्याच्या पावसामुळे काही भाजीपाला काळवट दिसत आहे. याचबरोबर वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्यावरील विविध रोग नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या फवारण्याचा देखील शेतकऱ्यांना आर्थिक धोरण सहन करावा लागत आहे.
Home Maharashtra maharashtra weather today, राज्यात पावसाचा कहर! बळीराजावर ओल्या दुष्काळाचे संकट, चिकनपेक्षाही महाग...
maharashtra weather today, राज्यात पावसाचा कहर! बळीराजावर ओल्या दुष्काळाचे संकट, चिकनपेक्षाही महाग मिळतील भाज्या – maharashtra rains in marathwada prices of vegetables will increase due to heavy rain
हिंगोली : मराठवाड्यात परतीच्या पावसाने सगळीकडेच दाणादाण उडविली आहे. मागील सात दिवसांत ३४ मंडळात अतिवृष्टी झाली असून, सोमवारी सकाळपर्यंत १० मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदविला गेला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील शिल्लक पिकांचा चिखल होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतीचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजीपाला पिकाला देखील या पावसाचा फटका बसल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत.