पाटणा : एका तांत्रिकाने शिक्षिकेसोबत अनेकवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तांत्रिकाने अनेक वर्षांपासून शारीरिक संबंध असल्याचा आरोप आहे. इतकंच नाहीतर कथित तांत्रिकाने तंत्र देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली. तांत्रिकाने शिक्षकाला सांगितलं की, तुमच्या शरीरात जीन आहे, यासाठी शरीर शुद्ध करावं लागेल. शारीरिक संबंध करून मंत्रांचं पठण करत शुद्धीकरण होईल, असंही मांत्रिकाने सांगितल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पीडितेने सांगितले की, तांत्रिक मंत्र म्हणायचा त्यामुळे अचानक भान हरपायचं. यादरम्यान त्याने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. शिक्षकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार तांत्रिकाच्या शोधात पोलीस सतत छापेमारी करत असल्याची माहिती आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील आहे. इथे राहणारी एक शिक्षिका (३०) सन २०१९ पासून त्वचेच्या समस्येने त्रस्त होती. डॉक्टरांच्या औषधांचा काहीही परिणाम होत नसताना शिक्षक कथित तांत्रिकाच्या बोलण्यात आली. पीडित शिक्षिकेनं सांगितलं की, ‘वडीलही खूप दिवसांपासून आजारी होते, मलाही त्वचेच्या त्रास होता. मला एका मित्राने सांगितले की शशिकांत हा समरेला हा चांगला बाबा आहे. तो तांत्रिक कृतीने सगळा त्रास दूर करतो. म्हणून मी शशिकांतच्या घरी गेले’

सावधान! पुढच्या ३-४ आठवड्यात भारतावर मोठं संकट, तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली
तुझ्या अंगात जिन्न आहे, संबंध ठेवून त्याला पळवावं लागेल…

तांत्रिकाने पीडितेला आधी घाबरवलं की तुझ्या घरात भूत आहे. त्याला पळवावं लागेल. त्यासाठी घरी पूजा करावी लागेल. पीडितेच्या घरी आणि ओंकारेश्वरच्या घाटावर तांत्रिक उपक्रमांच्या नावाखाली चौकी उभारली. मंत्र वाचला, पण प्रश्न सुटला नाही. शिक्षिकेचा आजार बरा झाला नाही, मग नराधम म्हणाला की, तुझ्या अंगात जिन्न आहे, त्याला हाकलण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील. यावरून तांत्रिकाने तिला भूरळ पाडत अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाहीतर चार लाख रुपयेही हडपले

जादूटोण्याच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितेने सर्वस्व गमावल्यानंतर फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर पीडितेने पैसे मागितले असता तांत्रिकाने तिला धमकावले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तांत्रिकाने शिक्षकाला अॅसिड टाकून जाळण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठून यासंबंधी तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी तांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

चंद्राने पृथ्वीचं टेन्शन वाढवलं! शास्त्रज्ञांनाही सतावतेय चिंता; वाचा आपल्यावर काय होणार परिणाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here