मुंबईः राज्यात दिवसभरात ६ हजार ७४१ करोना बाधित नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात सोमवारी ४ हजार ५०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण एक लाख ४९ हजार ००७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६७ टक्के इतके झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

वाचाः

राज्यात गेल्या २४ तासांत २१३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात मुंबईचा समावेश असलेल्या ठाणे आरोग्य मंडळातील मृत्यूची संख्या १४५ आहे. ८, ठाणे शहर १५, कल्याण-डोंबिवली ७, नवी मुंबई ७, वसई विरार ८, भिवंडी १२, उल्हासनगर येथे सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या १० हजार ६९५ इतकी झाली आहे. मुंबई महापालिका हद्दीत सोमवारी ९५४, कल्याण-डोंबिवली ४०५, ठाणे महापालिका ३०४, ठाणे जिल्हा २२०, वसई-विरार ९६, नवी मुंबई २५८, उल्हासनगर २१०, मिरा-भाईंदर १२२, रायगड १५९, पनवेल महापालिका ८६, भिवंडी २७ आणि पालघर जिल्ह्यात ५२ नवे रुग्ण आढळले आहेत.

वाचाः

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १३ लाख ७२ हजार ९३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ६६५ म्हणजेच १९.४९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ व्यक्ती घरीच विलगीकरणात आहेत. तर ४२ हजार ३५० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तसेच राज्यात एकूण १ लाख ०७ हजार ६६५ सक्रिय रुग्ण आहेत, असे टोपे म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here