ट्रॅव्हल्स क्र.एम.पी.३०,पी.२९५ भरधाव वेगाने प्रवासी घेऊन जात असतांना दोन युवक नवीन हिरो स्प्लेन्डर ने माहुली जहागीर कडे येत असतांना चीचखेड फाट्यानजीक ट्रॅव्हल्स ने दुचाकीला जबर धडक दिली यामध्ये दोन्ही युवक घटनास्थळीच ठार झाले. घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.
नागरिकांनी माहुली जहागीर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
माहुली जहागीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विरुळकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगितले. ट्रॅव्हल्स च्या चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पुढील तपास माहुली जहागीर पोलीस करीत आहेत.