मुंबई : आज सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे योग्य ठरते. दिवाळीचा सण जवळ आला आहे. या निमित्ताने सर्वांनी आर्थिक नियोजन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. तुम्ही पुढील एक वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर आयआयएफएल सिक्युरिटीजने पाच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत हे शेअर्स मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात.

Bonus Share: गुंतवणूकदारांना दिवाळी भेट; कंपनी देणार बोनस शेअर, होणार एवढा फायदा
फेडरल बँक
ब्रोकरेज फर्मने पुढील एक वर्षासाठी फेडरल बँकेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील दिवाळीपर्यंत हा शेअर २३० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सध्या हा शेअर १३३ रुपयांच्या आसपास व्यवहार करीत आहे. लक्ष्य किंमत सध्याच्या तुलनेत ७७ टक्के जास्त आहे. स्टॉप लॉस ६८ वर कायम ठेवायचा आहे. या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७८ रुपये आहे आणि सर्वोच्च पातळी १३३ रुपये आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल उत्कृष्ट आले आहेत.

टाटा समूहाचा हा शेअर घसरतोय; गुंतवणूकदारांचे नुकसान, ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर भाव
आडीएफसी फर्स्ट बँक
आयडीएफसी फर्स्ट बँकेसाठी लक्ष्य किंमत १०० रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा शेअर ५६ रुपयांच्या पातळीवर आहे. लक्ष्य किंमत सध्याच्या पातळीपेक्षा ७८ टक्क्यांनी जास्त आहे. २८ रुपयांचा स्टॉप लॉस कायम ठेवावा लागेल. २९ रुपये ही ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी आहे आणि रुपये ५६ ही या शेअरची सर्वोच्च पातळी आहे. जूनमध्ये शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर होता. तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन महिन्यांत शेअर ६२ टक्क्यांनी वाढला आहे. मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरसाठी ७० रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या तीन वर्षांत बँकेच्या किरकोळ ठेवींमध्ये पाच पटीने वाढ झाली आहे.

कोल इंडिया
कोल इंडियासाठी पुढील दिवाळीसाठी लक्ष्य किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा शेअर २४० रुपयांच्या पातळीवर आहे. जी ५२ आठवड्यांची सर्वोच्च पातळी आहे. लक्ष्य किंमत सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ११० टक्के जास्त आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादनात कंपनीच्या योगदान जवळपास ८० टक्के आहे. कंपनी राजस्थानमध्ये ११९० मेगावॅटचा सौर प्रकल्प उभारणार आहे. कंपनीने कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठी भेल, IOCL आणि GAIL सोबत करार केला आहे. या तीन कंपन्यांसोबत तीन स्वतंत्र सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

लक्ष्मी माताची कृपा होणार! दिवाळीच्या मुहूर्तावर हे शेअर्स खरेदी करा आणि तगडा परतावा मिळवा
इंडियन ऑइल
इंडियन ऑइलसाठी लक्ष्य किंमत १५० रुपये ठेवण्यात आली आहे. शेअर सध्या ६६ रुपयांच्या पातळीवर आहे. शेअरची सर्वोच्च पातळी ९४ रुपये आहे. लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे १३० टक्के जास्त आहे. २८ रुपयांचा स्टॉपलॉस कायम ठेवावा लागेल. मंदीच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त होत आहे. कंपनीचे सकल शुद्धीकरण मार्जिन सुधारेल आणि शेअर्सच्या वाढीला चालना मिळेल अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे.

अशोक लेलँड
अशोक लेलँडची लक्ष्य किंमत २५० रुपये ठेवण्यात आली आहे तर ९९ रुपयांचा स्टॉप लॉस कायम ठेवावा लागेल. सध्या हा शेअर १५० रुपयांच्या पातळीवर आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा लक्ष्य किंमत ६६ टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६९ रुपये आणि नीचांकी पातळी ९३ रुपये आहे. या वर्षात आतापर्यंत हा शेअर २२ टक्क्यांनी वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here