अमेरिकन शेअर बाजार आनंदी
अमेरिकेच्या शेअर बाजारांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही तेजी राहिली. वॉल स्ट्रीटचा मुख्य संवेदी निर्देशांक डाऊ जोन्स मंगळवारी ३३७ अंकांच्या किंवा १.१२% च्या वाढीसह ३०,५२३ वर बंद झाला. Nasdaq Composite देखील ०.९०% किंवा ९६ अंकांनी वाढून १०,७७२ स्तरावर बंद झाला. तर, खरेदीमुळे S&P १.१४% किंवा ४२ अंकांच्या वाढीसह ३७१९ वर बंद झाला.
यापूर्वी देशांतर्गत शेअर बाजारात बीएसईचा प्रमुख संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स ५४९ अंकांनी वाढून ५८,९६० वर तर निफ्टी १७५ अंकांनी वाढून १८,४८६ च्या पातळीवर राहिला. सेन्सेक्स समभागांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सर्वाधिक वाढली. याशिवाय, आयटीसी, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि लार्सन टुब्रो हे देखील प्रमुख शेअर्स वधारले. नुकसान झालेल्यांमध्ये एचडीएफसी लिमिटेड, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा आणि सन फार्मा यांचा समावेश होता.
दुसरीकडे, इतर आशियाई बाजारांमध्ये, दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँग वधारला तर चीनचा शांघाय कंपोझिट इंडेक्स तोट्यात राहिले.
कोणाला फायदा, कोणाला नुकसान
हेवीवेट स्टॉक्समध्ये आज खरेदी दिसत आहे. सेन्सेक्स ३० चे २१ समभाग हिरव्या चिन्हात आहेत. आजच्या टॉप गेनर्समध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड, सिप्ला, एल अँड टी, M&M, टायटन, टेक महिंद्रा यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये एचसीएल टेक, SBIN, टाटा स्टील, इन्फोसिस यांचा समावेश आहे.