करोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी आता प्रयत्न केले जाणार आहेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या कामासाठी निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे.
वाचाः
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. लोकसहभाग वाढविण्यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांनी हे काम सुरू करण्यापूर्वीच त्यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आयुक्तपदी नेमणूक झाल्याने ही जबाबदारी निंबाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
वाचाः
लोकसहभाग वाढविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा वापर करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. याबाबतच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नोडल ऑफिसर नियुक्त केले आहेत. त्यांच्याशी समन्वय ठेवणे आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचे सुचविण्यात आले आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या कामाचा अहवाल दररोज सायंकाळी ई-मेलद्वारे पाठविण्याचे निर्देश डॉ. म्हैसेकर यांनी दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times