नवी दिल्ली : आज खाद्यतेलाच्या घाऊक दरात वाढ झाली आहे. परदेशातील बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे तसेच सणांच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे आजच्या किमतीत वाढ झाली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते परदेशातील बाजारातील मजबूत कल आणि वाढती मागणी यामुळे मंगळवारी दिल्ली तेल तेलबिया बाजारात जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमतीत सुधारणा दिसून आली. व्यापाऱ्यांनी सांगितले की, दिवाळीचा सण जवळ आल्याने खाद्यतेलाची मागणी वाढली आहे, त्यामुळे बहुतांश खाद्यतेलाचे भाव वाढीसह बंद झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दिवाळीपूर्वी सरकारने दिली आणखी एक भेट, रब्बी पिकांचा MSP वाढवला
घाऊक किमतींवर कोणत्या संकेतांचा परिणाम
बाजार सूत्रांनी सांगितले की, मलेशिया एक्सचेंज मंगळवारी तीन टक्क्यांनी वधारला. त्याच वेळी, शिकागो एक्सचेंज देखील काल रात्री दोन टक्क्यांनी वाढले होते. सध्या तो एक टक्का वाढीसह व्यवहार करत असून सरकारने मंगळवारी चालू पीक विपणन वर्षासाठी मोहरी आणि सूर्यफुलाच्या किमान समर्थन मूल्यात (एमएसपी) ४०० रुपयांची वाढ केली. आता मोहरीचा भाव ५,४५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारच्या एका निवेदनात म्हटले आहे.

महागाईत आणखी एक झटका! गुजरात वगळता इतर राज्यात अमूल दुधाचे दर वाढले, पाहा किती महागले
किरकोळ किमतींवर दबाव कायम
सूत्रांच्या माहितीनुसार जोपर्यंत सरकार सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील २ दशलक्ष टन कोटा मर्यादा हटवत नाही, तोपर्यंत या तेलाचा पुरवठा कमी राहील आणि त्यांच्या किमती चढ्याच राहतील. सरकारच्या या निर्णयामुळे महसुलाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना प्रतिलिटर २० ते ३० रुपये अधिक मोजावे लागतात. सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन डेगमची आयात मर्यादा रद्द करावी किंवा पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारावे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

फ्रोझन पराठ्यामुळे खिसा गरम, भरमसाठ GST भरावा लागणार
किती वाढल्या किमती
मोहरी तेलबिया आज ७०० रुपये प्रति क्विंटल, भुईमूग ७२१० रुपये प्रति क्विंटल, सरसों पक्की घाणी २३६० रुपये प्रति टिन, सरसों कच्ची घाणी २४१५ रुपये प्रति टिन, सीपीओ एक्स कांडला ८६०० रुपये प्रति क्विंटल, पामोलीन २००० रुपये प्रतिक्विंटल पातळीवर पोहोचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here