मुंबई : पतमानांकन संस्था फिच (Ratings Agency Fitch) ने वर्ष २०२२ आणि २०२३ साठी अमेरिकेच्या आर्थिक वाढीचा (US Economic Growth)अंदाज कमी केला आहे. अमेरिकेतील महागाई (US Inflation) आणि मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात होत असलेली वाढ अमेरिकेला १९९० सारख्या मंदी (Recession) कडे ढकलत आहे, असे भाकित फिचने केले आहे. पुढील वर्षी अमेरिकेची अर्थव्यवस्था केवळ ०.५ टक्के वाढेल, असा अंदाज फिचच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

जगाची मंदीकडे वाटचाल; आता मायक्रोसॉफ्टमधून १ हजार कर्मचाऱ्यांना डच्चू
बेरोजगारी वाढणार
यापूर्वी जूनमध्ये १.५ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अमेरिकेत मंदीची शक्यता कमी आहे, असा अंदाज फिचच्या अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. परंतु २०२४ मध्ये बेरोजगारीचा दर सध्याच्या ३.५ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत वाढेल. म्हणजे लाखो नोकऱ्या बुडतील. मात्र, मागील दोन मंदीच्या तुलनेत ही संख्या कमी राहील, असेही फिच (Fitch) ने म्हटले आहे.

आर्थिक संकटाचा ‘फेरा’! जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जेपी मॉर्गन CEOचा इशारा, पाहा काय म्हणाले
महागाईमुळे खर्च कमी
फिचने म्हटले की, पुढील वर्षभरात घरगुती उत्पन्न आणि ग्राहक खर्चात घट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटेल. अमेरिकेत सप्टेंबरमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त महागाई वाढली आहे. वाढत्या महागाईच्या दबावामुळे फेडरल रिझर्व्ह पुढील महिन्यात व्याजदर ०.७५ टक्क्याने वाढवू शकते. पुरवठ्यात सुधारणा आणि तेलाच्या किमती कमी होऊनही अमेरिकेतील चलनवाढ फेडरल रिझर्व्हच्या २ टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा वरच राहिली आहे.

Wiproनंतर Infosys कंपनीनेही दिला अनेक कर्मचाऱ्यांना दिला ‘नारळ’
मायक्रोसॉफ्टचा १ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

दुसरीकडे अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये विविध विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कंपनीने मात्र नेमके किती कर्मचारी काढले हे सांगण्यास नकार दिला. मायक्रोसॉफ्टने म्हटले की, इतर कंपन्यांप्रमाणे आम्ही आमच्या व्यावसायिक प्राधान्यांचे नियमितपणे मूल्यांकन करतो. या आधारे संरचनात्मक बदल केले जातात. आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करत राहू आणि येत्या काही वर्षांत महत्त्वाच्या क्षेत्रात नियुक्त्या करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here