सांगली : लिफ्ट द्यायच्या बहाण्याने एका व्यक्तीला गाडीत बसवले , मग गाडी निघाली, पण काही अंतरावर जाऊन गाडी वळून पुन्हा त्याच जागेवर पोहोचली. प्रवासी उतरला. मात्र त्याच्याजवळ असणारी बॅग हातोहात लंपास केल्याचा प्रकार गाडी निघून गेल्यावर लक्षात आला. या घटनेदरम्यान तब्बल एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार इस्लामपूरच्या पेठ नाका या ठिकाणी घडला आहे. या घटनेमुळे इस्लामपुरात खळबळ उडाली आहे. (The four robbed a passenger by giving him a lift in a car in Sangli)

शिराळा तालुक्यातल्या निगडी येथे राहणारे विश्वास साळुंखे (वय ५५ वर्षे), यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. साळुंखे मंगळवारी दुपारच्या सुमारास पुणे-बंगळूरू मार्गावरील पेठ नाका येथून आपल्या गावी जाण्यासाठी स्टॉपवर थांबले होते. या दरम्यान एक आलिशान टाटा सफारी गाडी येऊन स्टॉपजवळ थांबली आणि गाडीतल्या चालकाने साळुंखे यांना कुठे जायचं आहे, अशी विचारणा केली. त्यावर मला शिराळ्याला जायचे आहे, असे सांगितल्यावर चालकाने शिराळयापर्यंत सोडतो असे साळुंखे यांना सांगितलं.

नवरा-बायकोने आखली योजना, नातेवाईकांच्या घराचीच केली निवड; शेवटी काय मिळवले?
यानंतर चालकाने गाडीतील पुढच्या सीटवर साळुंखे यांना बसण्यास सांगितले. साळुंके हे गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांच्याकडे असणारी बॅग गाडीच्या चालकाने मागच्या सीटवर ठेवण्यास सांगितले. मागच्या सीटवर दोन पुरुष आणि एक महिला बसली होती. साळुंखे यांनी आपली बॅग मागच्या सीटवर ठेवली. तिथून गाडी काही अंतरावर गेली असता गाडीला पिकअप नाही, बिघाड झाल्याचं कारण सांगत साळुंखे यांना पुन्हा पेठनाका स्टॉपवर चालकाने आणून सोडले. त्यानंतर साळुंखे ही आपली बॅग घेऊन गाडीतून उतरले.

लग्नानंतर प्रियकरासोबत पळून गेली, पाच वर्ष संसार, मग दोन चिमुरड्यांसह गर्भवती विहिरीत आढळली
त्यानंतर गाडी सुसाट निघून गेली. साळुंखे यांनी आपल्या बॅगेची तपासणी केली असता बॅगेत असणारी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. गाडीत मागील सीटवर बसलेल्या महिला आणि दोन पुरुषांनी रोख रक्कम आणि दागिने चोरल्याची बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन आपले रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल फसवून लंपास केल्याची फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

देशात काय चाललंय पाहा भाजपमध्ये या, राष्ट्रवादी सोडून भाजपमय झालेल्या नेत्याची विश्वजीत कदमांना ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here