मुंबई : ‘सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे करोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले. त्याचप्रमाणे येणारी देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी’, अशी अपेक्षा मुख्यमंत्री यांनी आज व्यक्त केली. ( CM Spoke On Bakri Eid )

वाचा:

बकरी ईद संदर्भात आज आयोजित ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. करोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचाही विचार कराला हवा. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वाचा:

धार्मिक भावनांचा आदर व्हावा

महाराष्ट्रातील सर्व जनतेने जातपात धर्म पंथ न मानता करोना विरुद्धच्या लढ्यात जे सहकार्य केले, केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले, त्यांचे तसेच ज्या यंत्रणा लढल्या, ज्यांनी जीवाची जोखीम पत्करली, त्या सर्वांचे आभार यावेळी उपमुख्यमंत्री यांनी मानले. आतापर्यंत झालेल्या सर्व सणांमध्ये सर्वांकडून सहकार्य मिळाले. बकरी ईदमध्ये देखील असेच सहकार्य अपेक्षित आहे. धार्मिक भावनांचा आदर करून बकरी ईदसुद्धा साधेपणाने साजरी करावी. सण साजरे करताना आरोग्याचा विचार देखील करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतील, तो जनतेला समजावून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

वाचा:

कुर्बानीचे विधी ऑनलाइन करावेत

गृहमंत्री म्हणाले की, करोना साथरोगाविरुद्ध लढाई लढताना गेल्या चार महिन्यांत जे सण उत्सव आले त्यात सर्वांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. तसेच सहकार्य बकरी ईद निमित्त करावे. साधेपणाने हा सण साजरा करावा. शक्यतो कुर्बानीचे विधी ऑनलाइन करावेत. आंतरराज्य वाहतूक अवघड आहे. त्याचाही विचार करावा लागेल. कंटेंन्मेंट झोन वगैरे अडचणी लक्षात घेता तसेच पोलिसांवरील ताण विचारात घेऊन ईद साधेपणाने करावी. या बैठकीस अल्पसंख्यांक विकास मंत्री , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार अमिन पटेल, रईस शेख, अबू असिम आझमी, झिशान सिद्धीकी उपस्थित होते. या सर्वांनी आपापली मते व्यक्त करून आवश्यक सूचना मांडल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here