गाझियाबाद: खुर्चीवर बसलेला असताना एका जिम ट्रेनरला हृदयविकाराचा झटका आला. अवघ्या काही सेकंदांत त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आदिल असं जिम ट्रेनरचं नाव असून तो ३५ वर्षांचा होता. आदिलच्या अकाली निधनानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आदिल फिटनेसबद्दल अतिशय जागरुक होता, असं त्याच्या मित्रांनी सांगितलं. आदिल दररोज जिमला जायचा. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं होईल याची कल्पनादेखील कोणी केली नव्हती. त्यामुळे आदिलचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला आहे यावर विश्वास ठेवणं त्याच्या मित्र परिवाराला जड जात आहे.
VIDEO: कामासाठी बाईकवरून निघाला, विचित्र आवाज येऊ लागला; स्पीड मीटर पाहून भीतीनं गाळण उडाली
आदिलनं नुकतंच प्रॉपर्टीचं काम सुरू केलं होतं. शालिमार गार्डनमध्ये त्याची स्वत:ची जिम होती. त्याच्या निधनामुळे आम्हा सगळ्यांना धक्का बसला असल्याचं आदिलचा मित्र पराग चौधरीनं सांगितलं. एक-दोन दिवसांपासून आदिलला हलका ताप होता. मात्र तरीही तो स्वत:चं काम अतिशय उत्तमरित्या करत होता. आदिलला ४ मुलं आहेत. आदिलच्या निधनानं त्यांचं पितृछत्र हरपलं आहे.
चेक पोस्टवर पोलिसांनी भाजप नेत्याची कार रोखली; डिक्कीत एक कोटी सापडले; विचारल्यावर म्हणतो…
तरुणांमध्ये हृदय विकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढल्याचं यशोदा रुग्णालयाचे वरिष्ठ हृदय रोग तज्ज्ञ डॉ. धीरेंद्र सिंघानिया यांनी सांगितलं. जीवनशैलीत झालेले बदल, जेवणाशी संबंधित चुकीच्या सवयी, व्यसनं, अपुरी झोप आणि तणावपूर्ण जीवन यांच्यामुळे हृदय विकाराच्या झटक्यांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढल्याची माहिती त्यांनी दिली. धकाधकीचं जीवन, त्यातील वाढ जाणारी स्पर्धा यामुळे आयुष्यातील तणाव वाढला आहे, असंही डॉक्टरांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here