Parbhani Live News Marathi : परभणीच्या सेलू तालुक्यातील शिराळा गावामध्ये ११ बैलांसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून बैलांची जीभ ही तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

 

farming news today
परभणी : लम्पिस्किनच्या संकटातून शेतकरी सावरत असताना पुन्हा परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरिपाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. आता पुन्हा शेतकऱ्यांवर वेगळेच विचित्र संकट आले आह़े. परभणीच्या सेलू तालुक्यातील शिराळा गावामध्ये ११ बैलांच्या जीभ रात्रीतून गळून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सेलू तालुक्यातील शिराळा गावातील शेतकऱ्यांनी आपले बैलं गोठ्यामध्ये बांधली होती. बैलांना कुठलाच आजार नव्हता. इतकंच नाहीतर शेतकऱ्यांनी टाकलेलं वैरणही बैलांनी व्यवस्थित खाल्लं. नंतर शेतकरी घराकडे गेले. सकाळी शेतकऱ्यांनी गोठ्यात येऊन बैलांची पाहणी केली असता बैलाच्या तोंडामधून रक्तस्राव होऊन त्यांची जीभ आपोआप गळून पडली असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आलं.

सावधान! पुढच्या ३-४ आठवड्यात भारतावर मोठं संकट, तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली
हा प्रकार घडल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिराळा गावाला भेट देऊन सदरील बैलांची तपासणी केली. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तुटलेली जीभ तपासणीसाठी पाठवली असून त्यांचा रिपोर्ट येणं बाकी आहे. असा प्रकार केवळ बैलांच्या बाबतीत होत असून गाय किंवा म्हशींमध्ये असं काही दिसलं नाही. अशा विचित्र प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून याचे योग्य निदान करण्याची मागणी होत आहे.

‘भूत उतरवण्यासाठी संबंध ठेवावे लागतील’, शिक्षिकेसोबत मंत्र वाचता-वाचता तांत्रिक झाला हैवान अन्…

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here