मुंबई: करोना विषाणूचे अनेक व्हेरिएंट्स आले. संपूर्ण जगात करोनाचा फैलाव झाला. कोट्यवधी जणांना करोनाची लागण झाली. लाखो लोकांचा मृत्यू झाला. आताही करोनाचे नवे व्हेरिएंट्स येत आहेत. जगात येणारी पुढील महामारी एखाद्या प्राणी किंवा पक्ष्यातून नव्हे, तर वितळणाऱ्या हिमनग, हिमकड्यांमुळे येणार आहे. हिमकड्यांच्या खाली अनेक प्राचीन जीवाणू आणि विषाणू दडलेले आहेत. ते पसरल्यास पृथ्वीवर महाभयंकर संकट येईल. या विषाणांमुळे सर्वप्रथम समुद्री जीव संक्रमित होतील. मग पक्षी आणि अन्य प्राण्यांना लागण होईल. त्यांच्या माध्यमातून हे संकट माणसांपर्यंत पोहोचेल.

जागतिक तापमान वाढ आणि वातावरणातील बदलांमुळे हिमकडे वितळत आहेत. या हिमकड्यांच्या खाली कोट्यवधी वर्षांपासून विषाणू आणि जीवाणू आहेत. प्रजननाच्या माध्यमातून त्यांची संख्या वाढत आहे. आर्टिकच्या बर्फाळ प्रदेशात तलाव आहेत. हे तलाव जीवाणू आणि विषाणूंचं प्रजनन केंद्र आहेत. या विषाणूंमुळे इबोला, इन्फ्लूएंझापेक्षा भयंकर संकटं येतील.
डॉक्टर साहेब, हा साप मला चावला आणि मेला! किंग कोब्रा घेऊन दारुडा रुग्णालयात पोहोचला अन्…
शास्त्रज्ञांनी नुकताच आर्टिक सर्कलच्या उत्तरेला असलेल्या लेक हेजेनचा अभ्यास केला. या परिसरातील माती आणि दगडांचा चाचणी करण्यात आली. तिथून डीएनए आणि आरएनए मिळवण्यात आला. त्यांचं सिक्वेन्सिंग करण्यात आलं. विषाणू, जीवाणूंचा शोध लावण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्या. हे विषाणू कोणत्या प्राण्यांचे आहेत, कोणत्या वृक्षांचे, झुडूपांचे आहेत, याचा शोध घेण्यात आला. हे विषाणू पसरण्याचा धोका आहे. सागरी जीवांच्या माध्यमातून ते जमिनीवरील प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यानंतर ते माणसांपर्यंत पोहोचू शकतात.
VIDEO: अजगरानं अख्खी बकरी गिळली; शाळेच्या बसमध्ये जाऊन लपला; वारंवार खेचूनही बाहेर पडेना
हिमकडे वितळत असल्यानं विषाणू पसरण्याचा धोका वाढणार असल्याची माहिती प्रेसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटीनं अहवालात छापली आहे. या सगळ्या मागचं कारण हवामानातील बदल आहे. आर्टिक परिसर नव्या महामारींचा केंद्रबिंदू ठरू शकतो. याच माध्यमातून जगभरात नव्या महामारी पसरू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here