Corona Virus Mumbai: करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह केरळमधील रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत करोनाचे १५० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ५ दिवसांत सरासरी १० जणांना रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ४७७ नवे रुग्ण आढळून आले. यातील १७८ रुग्ण मुंबईतील होते.

 

corona mum
मुंबई: करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासह केरळमधील रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत गेल्या तीन दिवसांत करोनाचे १५० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ५ दिवसांत सरासरी १० जणांना रुग्णालयात दाखल करावं लागत आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ४७७ नवे रुग्ण आढळून आले. यातील १७८ रुग्ण मुंबईतील होते. राज्यात नव्या एक्स बी बी सब व्हेरिएंटचाही रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिवाळीच्या आधी आणि दिवाळी दरम्यान बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या वाढू शकते, अशा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

fb 31

थंडीच्या दिवसांत करोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असं मुंबईच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईत इन्फ्ल्यूएंझासारख्या आजारांवरही बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. कारण इन्फ्ल्यूएंझादेखील संसर्गजन्य आजार आहे. तो शिंकण्यामुळे पसरतो. काही जणांना करोनाची लागण झालेली असू शकते. पण ते त्याला साधा सर्दी, खोकला समजू शकतात. यामुळे त्यांनी कोविड चाचणी न केल्यास विषाणू दुसऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांनी वर्तवली.
ओमायक्रॉनच्या नव्या प्रकाराचा धोका; दिवाळीत अशी घ्या काळजी, मुंबई महापालिकेचे आवाहन
करोना रुग्णांची संख्येतील वाढ गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. जोपर्यंत कोणताही नवा व्हेरिएंट येत नाही, तोपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटची संक्रामकता कमी राहील, असं मुंबईत कोविड टास्क फोर्सचे सदस्य राहिलेल्या डॉ. राहुल पंडित यांनी सांगितलं. करोनामुळे घाबरण्याची गरज नाही. मात्र सावधान राहण्याची आवश्यकता आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवा. कुटुंबात कोणी आजारी असेल किंवा एखाद्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर त्यांनी मास्क लावावा, असा सल्ला पंडित यांनी दिला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here