नेटकऱ्यांनी जोडलं भन्नाट कनेक्शन
आता तुम्ही म्हणाल मलायका आणि अर्जुन यांचा खर्गेंनी निवडणूक जिंकण्याशी काय संबंध? पण आजकाल एवढे भन्नाट मीम्स बनवले जात आहेत आणि मलायका-अर्जुन व्हायरल होण्यामागेही एक भन्नाट मीमच आहे. तर झालं असं की एका युजरने काँग्रेस अध्यक्ष झालेल्या ‘मल्लिकार्जुन’ खर्गेंना शुभेच्छा देण्याऐवजी ‘मलायका-अर्जुन’ला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मल्लिकार्जुन’ आणि ‘मलायका-अर्जुन’ या नावांमध्ये काहीसे साधर्म्य असल्याने जोडलेल्या कनेक्शनमुळे हे मीम पाहून नक्कीच कपाळाला हात मारून घ्याल.

हे वाचा-साजिद खानला बिग बॉसमधून बाहेर काढाच! बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा संताप
ट्विटरवर करण्यात आलेली ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. १५०० हून अधिक लोकांनी ही ट्विटर पोस्ट लाइक केली असून पोस्टवरील रीट्विटची संख्या वाढते आहे. यावर अनेक ट्विटर युजरने कमेंट्स करत या मीमचा आनंद घेतला आहे. रिषभ नावाच्या व्यक्तीच्या ट्विटर अकाउंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे.
खर्गे यांच्या रुपात काँग्रेसला जवळपास २४ वर्षांनी असा अध्यक्ष मिळाला आहे ज्याचे आडनाव ‘गांधी’ नाही आहे. त्या दरम्यानच व्हायरल होणारा हा फोटो हसून हसून लोटपोट करणारा आहे.