सिंधुदुर्ग मधुसुदन नानिवडेकरः मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली येथे सुरु असलेल्या महामार्गाच्या कामाच्या दर्जाचा फज्जा उडाला असून सोमवारी उड्डाणपूल जोडणारी भिंतच कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आधी कोरोनाचे संकट आणि प्रचंड पाऊस आणि त्यात रहदारीच्या ठिकाणी काल जोड रस्त्याची भिंत कोसळल्याने कणकवलीकर ठेकेदार कंपनीच्या विरोधात एकटवले असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

वाचाः

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज कणकवलीला भेट देऊन कोसळलेल्या उड्डाणपुलाची पाहणी केली. या सर्व प्रकारामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीच्या दर्जावर अनेक प्रश्नचिन्हे उमटली आहेत. दरम्यान कालच कणकवलीच्या प्रांताधिकारी यांनी लोकभावनेची कदर करत हायवेची कामे थांबवण्याचे निर्देश दिले. आज ‘आम्ही कणकवलीकर’ संघटनेच्या वतीने अशोक करंबेळकर आणि विनायक मेस्त्री यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

वाचाः

अत्यंत बोगस आणि नित्कृष्ट काम करून ठेकेदारांनी कणकवलीच्या रस्त्यांची वाट लावली आहे. ठेकेदार कणकवलीकरांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी कणकवली ते कुडाळ अशी महामार्गाची पाहाणी करून दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीला खडसावले होते. काही दिवसांपूर्वी ‘सांगा गडकरी साहेब…आम्ही चिन्यांशी कसे लढणार?? !’ असा फलक सामाजिक कार्यकर्ते विनायक मेस्त्री यांनी महामार्गावर लावला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here