गाझियाबाद : गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाहीतर याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इथे एका ३३ वर्षीय जिम ट्रेनरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते खुर्चीवर आरामात बसले होते. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हा सगळ्यांनाच धक्का बसेल.
रविवारी सायंकाळी ते कामानिमित्त तो ऑफिसमध्ये गेला होता. त्याच्यासोबत त्याचे काही मित्रही होते. सर्व मित्र आपापसात बोलत असतानाच अचानक आदिलला हृदयविकाराचा झटका आला. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. आदिल विवाहित होता आणि त्याला ४ मुलंही आहेत.