दरम्यान, डॉग स्कॉडच्या मदतीने पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या घराच्या परिसरात केली पाहणी. पेट्रोल बाटल्यांसह, स्टंप आणि दगड पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेतली आहे पोलिसांनी सांगितले आहे.
चिपळूणमध्ये काही वेळ वातावरण तापले
पोलिसांची सुरक्षा मिळावी म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी हा खोटा स्टंट केला असा आरोप चिपळूण मध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच कुडाळ येथे भाजपा नेत्यांविरोधात वैयक्तिकीक पातळीवर टीका करताना चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आठ दिवसात अटक केली नाही तर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील व चक्का जाम आंदोलन छेडतील असा इशारा भाजपचे माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी दिला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाने चिपळूण पोलिसांना आज संध्याकाळी निवेदन सादर केले.
नारायण राणे यांचे बॅनर फाडण्यात आले असून आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी खासदार नीलेश राणे याच्यावर टीका केली आहे. त्याबद्दल त्यांना अटक करावी अशी मागणी जिल्हा भाजपने केली आहे. जाधव यांना आठ दिवसात अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा भाजप पदाधिकारी यांनी दिला आहे. हल्यात भाजपचा काडी मात्र सबंध नाही. असल्यास त्याला जरूर ताब्यात घ्या … ज्यांनी भाजपचे बॅनर फाडले आहेत त्यावर कारवाई करा भाजप पदाधिकारी यांनी मागणी केली.