मुंबई: अवघं जग संसर्गाने बेजार असून करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी लढाई सुरू आहे. या लढाईत मुंबईतील या झोपडपट्टीने जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले आहे. धारावीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांनी सर्वांचे लक्ष वेधणारी कामगिरी करून दाखवली आहे. धारावी करोनाच्या विळख्यातून बाहेर पडणे अशक्यप्राय असल्याचे वाटत असताना स्वयंशिस्तीचे अभूतपूर्व दर्शन घडवत धारावीने करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले. या लढाईची थेट जागतिक आरोग्य संघटनेने दाद घेऊन पाठ थोपटल्यानंतर श्रेयवाद उफाळून आला आहे. ( )

वाचा:

जागतिक आरोग्य संघटनेने धारावीचं कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री यांनी ‘शाब्बास धारावी’ म्हणत धारावी मॉडेलचा आदर्श संपूर्ण देशासाठी करोना विरुद्ध लढाईत दिशादर्शक असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या यशावरून एक वेगळीच श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. धारावी आरएसएसच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र आपलं आरोग्य धोक्यात घालून काम केलं आहे. त्यामुळे या यशात आरएसएसचाही वाटा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी नमूद केले होते. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनीही तोच सूर आळवला होता. त्यानतर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून यावर जोरदार तोफ डागण्यात आली होती. ‘काही चांगले घडले की ते आमच्यामुळे. रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला तरी तो आमच्यामुळेच, असं म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. संकटसमयी हे सगळं यांना सुचतं तरी कसं?,’ असा खरमरीत सवाल शिवसेनेने विचारला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा धारावीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून टोलेबाजी केली आहे.

वाचा:

‘करोना व्हायरसच्या या लढ्यात देशाच्या विविध भागांतून करोना योद्धे लढत आहेत. डॉक्टर, पोलीस सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था या लढाईत सामील झाल्या आहेत. मुंबई, पुण्यातील दाट लोकवस्तीच्या भागात गेल्या तीन महिन्यांपासून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन अत्यंत धाडसाने नागरिकांचे स्क्रीनिंग, टेस्टिंग, आयसोलेशन यात हातभार लावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेक सामाजिक संघटना आणि रुग्णालयांनी जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. लोकांच्या मनातून करोनाची भीती दूर व्हावी व प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, हा एकच उद्देश डोळ्यापुढे ठेवून हे काम सुरू होते. आता जागतिक आरोग्य संघटनेने धारावीच्या यशस्वी लढ्याची माहिती जगभर सांगितली तेव्हा खरंतर सरकार या यशाचं श्रेय प्रत्येक लहानमोठा कार्यकर्ता व स्वयंसेवकांना देईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले. करोनाच्या भयाण महामारीत जे धारावीचं यश मिळालं आहे त्याचं श्रेय केवळ तिथे झटणाऱ्या करोना योद्ध्यांनाच जातं, करोनाच्या काळात घरातून बाहेरसुद्धा निघाला नाही अशा कोणत्याही नेत्याला हे श्रेय घेता येणार नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. धारावीची जनता हुशार आहे. कधी, कोणी, कोणाची कशाप्रकारे मदत केली आहे, हे त्यांना निश्चितच माहिती आहे, असे पाटील यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here