इतकी आहे किंमत
मुकेश अंबानी यांनी हा व्हिला कुवेत उद्योगपती मोहम्मद अलशाया यांच्या कुटुंबाकडून गेल्या आठवड्यात तब्बल १३५२ कोटी रुपयांना (१६.३ कोटी डॉलर) खरेदी केला आहे. मुकेश अंबानींच्या या घराच्या खरेदीबाबत दुबईच्या भूमी विभागाने खरेदीदाराची ओळख जाहीर न करता या सौद्याबाबत माहिती दिली आहे. त्याच वेळी अलशाया आणि रिलायन्सकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अलशाया समूहाकडे स्टारबक्स, एचअँडएम आणि व्हिक्टोरियाज सिक्रेटसह रिटेल ब्रँडसाठी स्थानिक फ्रेंचायझी आहेत.
जगातील अनेक भागांमध्ये प्रॉपर्टी
अंबानी हे मार्केट कॅपच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे एकूण ८४ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. एका अहवालानुसार, अंबानी जगातील अनेक भागांमध्ये प्रॉपर्टी खरेदी करत आहेत. यापूर्वी रिलायन्सने गेल्या वर्षी यूकेचा लोकप्रिय आणि प्रतिष्ठित कंट्री क्लब स्टोक पार्क ७.९ कोटी डॉलरला विकत घेतला होता. अंबानी सध्या न्यूयॉर्कमध्येही प्रॉपर्टी शोधत आहेत.
याआधीही घर खरेदी
अंबानी यांनी यावर्षी दुबईमध्ये 8 कोटी डॉलर्सला घर खरेदी केले होते. हा दुबईमधील सर्वात मोठा मालमत्ता करार होता. परंतु दुबई लँड डिपार्टमेंटने या आठवड्याच्या सुरुवातीला पाम जुमेराहवर १६.३ कोटी डॉलरच्या मालमत्ता कराराची नोंद केली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे.